*1 लाखाहून अधिक नागरिकांनी घेतले कोव्हीड लसीचे दोन्ही डोस*
16 जानेवारीपासून कोव्हीड लसीकरणाला सुरुवात झालेली असून सध्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोव्हीड लसीकरणावर विशेष लक्ष देत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यादृष्टीने नियोजनबध्द पावले उचलण्यात येत असून लसीकरण केंद्रांमध्येही लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत 34 लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. तसेच जास्त प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर जलद लसीकरणासाठी 50 पेक्षा अधिक नवीन लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 3 लाख 89 हजार 665 नागरिकांचे कोव्हीड लसीकरण करण्यात आलेले असून त्यामधील 1 लाख 996 नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशाप्रकारे एकूण 4 लक्ष 90 हजार 661 कोव्हीड लसीचे डोस नागरिकांना देण्यात आलेले आहेत.
सध्या शासन स्तरावरून महानगरपालिकेस प्राप्त होणा-या लसींच्या पुरवठ्यानुसार दररोजच्या लसीकरणाचे नियोजन केले जात असून त्यास नागरिकांच्या माहितीसाठी सोशल माध्यमांचा वापर करून व्यापक प्रसिध्दी दिली जात आहे. संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी 45 वर्षावरील नागरिकांना किमान 1 डोस देऊन व्हावा असे नियोजन करण्यात आले असून लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी 4 लाख लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडरही प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
महापालिका क्षेत्रात झालेल्या लसीकरणाचा तपशील -
तपशील
|
पहिला डोस
|
दुसरा डोस
|
पहिला टप्पा -
डॉक्टर्स व इतर आरोग्यकर्मी
|
32381
|
20240
|
दुसरा टप्पा -
पोलीस, सुरक्षा. स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे
|
27389
|
13074
|
तिसरा टप्पा -
ज्येष्ठ नागरिक
|
73916
|
41738
|
45 वर्षावरील कोमॉर्बीड व्यक्ती
|
10277
|
10277
|
45 ते 60 वयाचे नागरिक
|
128758
|
14644
|
18 ते 44 वयाचे नागरिक
|
116944
|
1023
|
एकूण
|
389665
|
100996
|
अशाप्रकारे 8 जून 2021 पर्यंत एकूण 3 लक्ष 89 हजार 665 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले असून त्यामधील 1 लाखाहून अधिक नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोसही घेतलेला आहे. कोव्हीडची लस पूर्णत: सुरक्षित असून नागरिकांनी कोव्हीड लस घेऊन आपल्याला संरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-06-2021 14:02:05,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update