नमुंमपा 11 सेवानिवृत्त कर्मचा-यांना सन्मानपूर्वक निरोप
आपल्या सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केला जाणारा सेवानिवृत्ती समारंभ हा त्यांनी केलेल्या कामाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा असून त्यांनाही केलेल्या कामाचे समाधान देणारा असल्याचे मत प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून मे महिन्याच्या अखेरच्या दिवशी निवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या वर्मा, विधी अधिकारी श्री. अभय जाधव, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.
मे महिन्याच्या अखेरच्या दिवशी महापालिका सेवेतून निवृत्त होणा-या मुख्य वैद्यकशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रीम. प्रभा नंदकिशोर सावतं, मुख्याध्यापक श्रीम. मेघा मधुकर आचरेकर व श्री. प्रविणचंद्र पुरुषोत्तम अत्तरदे, शिक्षक श्री.समाधान विश्वनाथ झरे, अधिक्षक श्री. संतोश नारायण पाटील, मिश्रक श्री. कैलास भाऊराव वाघ, आरोग्य सहाय्यक श्री. कैलास शंकर गढरी, कक्षसेवक श्री. राजाराम गोविंद सुरवसे व श्री. नरेंद्र बाळाराम म्हात्रे, सफाई कामगार कम क्लिनर श्री. महेंद्र भगवान लोंढे, मदतनीस श्री. सुनिल शांताराम तांडेल अशा 11 अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानीत करण्यात आले.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचारी यांना निवृत्तीच्या दुस-या दिवसापासूनच सर्व लाभ मिळावेत असे निर्देश दिले असून प्रशासन विभागामार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती उपआयुक्त श्री. नितीन नार्वेकर यांनी दिली.
Published on : 01-06-2023 12:58:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update