शुक्रवारी 12 जुलै रोजी, सकाळी 11.30 वा. स्वच्छता व आरोग्याविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. माधवी इंगळे साधणार विद्यार्थ्यांशी फेसबुक लाईव्ह संवाद
‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियान हे 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत असून या माध्यमातून स्वच्छता आणि आरोग्याचा परस्पर पूरक संबंध लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत व त्यामध्ये व्यापक लोकसहभाग करून घेण्यात येत आहे.
या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांवर उमलत्या वयातच स्वच्छतेचे संस्कार व्हावेत व त्यांच्यामध्ये आरोग्य जागरूकता वाढावी यादृष्टीने एक अभिनव ऑनलाईन उपक्रम राबविण्यात येत असून महानगरपालिकेच्या ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. माधवी इंगळे विद्यार्थ्यांशी फेसबुक लाईव्ह व्दारे थेट संवाद साधणार आहेत.
‘हेल्थ हिरो होऊया – आपले आरोग्य जपूया’ या शिर्षकांतर्गत हा विद्यार्थ्यांशी फेसबुक लाईव्ह थेट ऑनलाईन संवाद होणार असून यामध्ये त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत व त्यांच्या मनातील प्रश्नांचे निराकरणही करणार आहेत.
शुक्रवार दि.12 जुलै 2024 रोजी, सकाळी 11.30 वा., डॉ. माधवी इंगळे नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात उपस्थित विद्यार्थ्यांशी ‘हेल्थ हिरो होऊया – आपले आरोग्य जपूया’ या विषयांतर्गात सुसंवाद साधणार आहेतच शिवाय त्याचवेळी महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांमधील विद्यार्थीही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या सुसंवादात सहभागी होणार आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या @nmmconline या फेसबुक पेजवरून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 11-07-2024 06:50:51,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update