वाशी सेक्टर 15 येथील बी/2 टाईप वसाहतीजवळील चौकास नामकरण संपन्न
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी प्रभाग क्रमांक 62 येथे बी/2 टाईप सेक्टर 15 च्या प्रवेशव्दाराजवळील दत्तगुरु नगर सोसायटीच्या कोप-यावरील चौकास कै. ना.भि. नाईक सर चौक असा नामकरण समारंभ नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क प्रभाग समिती अध्यक्ष तथा ठराव सूचक स्थानिक नगरसेविका श्रीम. अंजली वाळुंज, माजी महापौर श्री. चंदू राणे, माजी स्थायी समिती सभापती श्री. श्याम महाडीक, माजी परिवहन समिती सभापती श्री. शेलाजी केसरकर व श्री. प्रदिप गवस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ना. भि. नाईक सर हे नवी मुंबईतील ज्येष्ठ समाजसेवक व फेडरेशनचे पदाधिकारी तसेच साहित्यिक म्हणून सुपरिचीत होते. सामाजिक क्षेत्रात सक्रीय योगदान देत अनेक लोकोपयोगी कार्यात त्यांनी भरीव योगदान दिले होते. त्यांच्या कार्याचे स्मरण रहावे याकरिता नगरसेविका तथा क प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. अंजली अजय वाळुंज यांनी क प्रभाग समिती सभेत मांडलेल्या व महापालिका सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेल्या नामकरण प्रस्तावानुसार महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते हे नामकरण संपन्न झाले.
Published on : 11-02-2020 08:36:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update