नवी मुंबई महानगरपालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती संपन्न


नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात ॲम्फीथिएटरमध्ये महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेता श्री. रविंद्र इथापे, फ प्रभाग समिती अध्यक्षा श्रीम. अनिता मानवतकर, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किरणराज यादव, मुख्य लेखा परिक्षक श्री. दयानंद निमकर, शिक्षणाधिकारी श्री. संदीप संगवे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही वाशी येथील पाहणी दौ-यानंतर महर्षि वाल्मिकी यांचे प्रतिमापूजन करून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक श्री. निवृत्ती जगताप, अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
Published on : 25-10-2018 09:50:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update