क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने 3 जानेवारी 2020 रोजी क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या नोंदणीकृत महिला संस्था / महिला मंडळ यांना ‘क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करण्यात येत आहे. त्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून सर्व विभाग कार्यालये तसेच समाज विकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी. बेलापूर येथे उपलब्ध असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 डिसेंबर 2019 आहे.
त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये विभाग कार्यालय स्तरावर ‘महिला सबलीकरण’ अथवा ‘जल संवर्धन’ या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात येत आहे. तसेच ‘भारतीय मेहंदी’ या विषयावर मेहंदी स्पर्धा, ‘स्त्री शिक्षणाचे जनक’ या विषयावर निबंध स्पर्धा, पाले भाज्या पासून तयार केलेले पौष्टीक पदार्थ या विषयावर पाककला स्पर्धा तसेच सॅलेड स्पर्धा आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय महिलांच्या अंगभूत कलागुणांना उत्तेजन देणा-या नृत्य, गायन, नाट्य स्पर्धाही आयोजित करण्यात येत असून त्यासाठी 21 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करावयाचे आहेत.
यामधील रांगोळी व मेहेंदी स्पर्धेचे आयोजन विभागनिहाय दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 2 व मेहंदी स्पर्धा दु. 2 ते 4 या वेळेमध्ये होईल.
तसेच नृत्य, गायन व नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी अनुक्रमे गायन दि.25 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2, नृत्य व नाट्य स्पर्धा दु. 2 ते 6 या वेळेत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 28, विश्वासराव विद्यालय, सेक्टर 15/16, मॉडर्न कॉलेज शेजारी, वाशी, नवी मुंबई येथे प्राथमिक फेरी घेण्यात येईल.
3 जानेवारीच्या कार्यक्रमात यामधील काही स्पर्धांची अंतिम फेरी व महिला मंडळे / महिला बचत गटांना त्यांनी उत्पादीत केलेल्या साहित्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून स्टॉलसाठी 27 डिसेंबर पर्यंत अर्ज करावयाचे आहेत.
स्पर्धांची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती महानगरपालिकेची आठ विभाग कार्यालये व उप आयुक्त, समाज विकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर येथे शासकीय सुट्टया वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील तसेच स्विकारले जातील.
या स्पर्धांमध्ये केवळ नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणा-या महिला सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी 27567279 या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर तसेच बेलापूर व नेरुळ विभागाकरिता श्री. दादासाहेब भोसले (9372106976), वाशी व तुर्भे विभागाकरिता श्री. दशरथ गंभिरे (9702309054), कोपरखैरणे व घणसोली विभागाकरिता श्री. सुंदर परदेशी (9594841666) तसेच ऐरोली व दिघा विभागाकरिता श्री. प्रकाश कांबळे ( 9969008088 ) यांचेशी संपर्क साधावयाचा आहे.
तरी महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित या विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे तसेच महिला मंडळे / महिला बचत गटांनी स्टॉल लावून उत्पादित केलेल्या वस्तु विक्रीच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम. संगीता अशोक पाटील आणि सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 16-12-2019 07:11:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update