चीनमधील युवू शहराच्या महापौरांकडून नवी मुंबईच्या आकर्षकतेचे कौतुक
नवी मुंबई शहराच्या हद्दीत प्रवेश केल्यापासूनच त्याचे वेगळेपण नजरेला जाणवते अशा शब्दात नवी मुंबईची प्रशंसा करीत चीन देशातील युवू शहराचे महापौर श्री. व्हॅँग जियान यांनी नवी मुंबईचे भविष्य आणखी उज्वल असल्याचे अभिप्राय नोंदविले. नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. उषा भोईर व श्रीम. श्रध्दा गवस, नगरसेवक श्री. विनोद म्हात्रे, नगरसेविका श्रीम. सलुजा सुतार व श्रीम. अनिता मानवतकर तसेच महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी सादरीकरणाव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची तसेच महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उल्लेखनीय कामांची व प्रकल्पांची माहिती सादर केली. युवू शहराचे महापौर श्री. व्हँग जियान यांनीही जगातील सर्वात मोठे वाणिज्य शहर असल्याची सादरीकरणाव्दारे माहिती देत युवू व नवी मुंबई या दोन शहरांमध्ये बरेचसे साम्य असल्याचे सांगत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत असी अपेक्षा व्यक्त केली. नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी नवी मुंबईचे विविध सुविधांमधील वेगळेपण अदोरेखीत करीत नवी मुंबईचा प्रथम नागरिक या नात्याने युवू सारख्या नामांकित शहराच्या महापौरांचे नवी मुंबई स्वागत करताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीची व तेथील व्यवस्थेची प्रशंसा करीत यूवू शहराच्या महापौरांनी त्यांच्या शहरात येण्याचे निमंत्रण नवी मुंबईचे महापौर, आयुक्त यांचेसह पदाधिका-यांना दिले. यावेळी युवू शहराच्या महापौरांसह उपस्थित संचालक श्री. यांग झोनघॉन्ग व श्री. लाऊ झिओडॉँन्ग आणि इतर पदाधिकारी व अधिका-यांचेही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
Published on : 24-12-2019 12:51:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update