आंतरशालेय क्रीडा स्पर्धेतून महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव
नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी अभ्यासाप्रमाणेच कला, क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य चांगल्या रितीने दाखवित आंतरशालेय स्पर्धेमुळे त्यांना आपला खेळ प्रदर्शित करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी यामधील गुणवंताना सुयोग्य क्रीडा प्रशिक्षण देऊन दर्जेदार खेळाडू घडविण्यात येतील असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि क्रीडा व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने सी.बी.डी. बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 2020 च्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक श्री. अशोक गुरखे, शिक्षण व क्रीडा - सांस्कृतिक विभागाचे उपआयुक्त श्री.नितीन काळे, क्रीडा अधिकारी अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू श्रीम. अभिलाषा म्हात्रे व श्री. रेवप्पा गुरव, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. रुतिका संखे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी कोणत्याही खेळात यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करण्याची तयारी ठेवावी व त्यासोबतच सात्विक आणि सर्व पोषण मूल्य मिळतील असा सात्विक, पौष्टिक आहार घ्यावा असे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये 10 केंद्रस्तरांवर झालेल्या केंद्रस्तरीय स्पर्धांतून खो-खो, कबड्डी व क्रिकेट या खेळांतील अंतिम विजेत्या संघांची महापालिका स्तरावर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये केद्रस्तरावरील विजेत्या संघातील 4 हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
आंतरशालेय खो-खो स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 55, आंबेडकरनगर राबाडे अंतिम विजते तसेच शाळा क्र. 41, अडवली भूतावली उपविजेते ठरले. शाळा क्र. 55, आंबेडकरनगर राबाडेचा विद्यार्थी गणेश यादव स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला. 14 वर्षाखालील मुलींमध्ये शाळा क्र. 41, अडवली भूतावली हा संघ अंतिम विजता आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 55, आंबेडकरनगर राबाडे उपविजेता संघ ठरला. शाळा क्र. 41, अडवली भूतावलीची विद्यार्थिनी पुजा सुवारे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.
आंतरशालेय खो-खो स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 104, आंबेडकरनगर राबाडे अंतिम विजते तसेच शाळा क्र. 102, नेरूळ उपविजेते ठरले. शाळा क्र. 104, आंबेडकरनगर राबाडेचा विद्यार्थी वैभव गोरे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला. 17 वर्षाखालील मुलींमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 104, आंबेडकरनगर राबाडे अंतिम विजते तसेच शाळा क्र. 102, नेरूळ उपविजेते ठरले. शाळा क्र. 104, आंबेडकरनगर राबाडेची विद्यार्थिनी मीना कांबळे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.
आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांमध्ये शाळा क्र. 72, कोपरखैरणे अंतिम विजते तसेच शाळा क्र. 18, सानपाडा उपविजेते ठरले. शाळा क्र. 72, कोपरखैरणेचा विद्यार्थी रिंकू केवट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला. 14 वर्षाखालील मुलींमध्ये शाळा क्र. 78, राबाडे हा संघ अंतिम विजता आणि शाळा क्र. 31, कोपरखैरणे उपविजेता संघ ठरला. शाळा क्र. 78, रबाळेची विद्यार्थिनी निशा गुप्ता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.
आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांमध्ये शाळा क्र. 112, करावे अंतिम विजते तसेच शाळा क्र. 116, सानपाडा उपविजेते ठरले. शाळा क्र. 112, करावेचा विद्यार्थी भोला मेस्त्री स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला. 17 वर्षाखालील मुलींमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. 104, आंबेडकरनगर राबाडे अंतिम विजते तसेच शाळा क्र. 102, नेरूळ उपविजेते ठरले. शाळा क्र. 104, आंबेडकरनगर राबाडेची विद्यार्थिनी साधना यादव स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.
आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांमध्ये शाळा क्र. 41, अडवली भूतावली अंतिम विजते तसेच शाळा क्र. 48, दिवा उपविजेते ठरले. शाळा क्र. 41, अडवली भूतावलीचा विद्यार्थी रंजन ठाकूर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला. 14 वर्षाखालील मुलींमध्ये शाळा क्र. 2, दिवाळे हा संघ अंतिम विजता आणि शाळा क्र. 18, सानपाडा उपविजेता संघ ठरला. शाळा क्र. 102, दिवाळेची विद्यार्थिनी कृतिका कोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.
आंतरशालेय खो-खो स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलांमध्ये शाळा क्र. 102, नेरूळ अंतिम विजते तसेच शाळा क्र. 112, करावे उपविजेते ठरले. शाळा क्र. 102, नेरूळचा विद्यार्थी अमर यादव स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला. 17 वर्षाखालील मुलींमध्ये शाळा क्र. 103, ऐरोली अंतिम विजते तसेच शाळा क्र. 102, नेरूळ उपविजेते ठरले. शाळा क्र. 103, ऐरोलीची विद्यार्थिनी संगीता जयस्वाल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूची मानकरी ठरली.
अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते.
Published on : 28-01-2020 11:49:17,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update