नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत महिला व बालकल्याण, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती तसेच विद्यार्थी व युवक कल्याण समितीमार्फत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांकरीता दि. 31 जानेवारी 2020 रोजीपर्यंत मुदत देवून अर्ज मागविण्यात आलेले होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळणेच्या हेतून शिष्यवृत्ती अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि. 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
अ.क्र.
|
योजनेचे नांव
|
1.
|
विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना तसेच निराधार मुलांना शिष्यवृत्ती देणे.
|
2.
|
आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या मुला-मुलींना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
|
3.
|
इयत्ता 1 ली ते पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ता प्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
|
4.
|
नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.
|
5.
|
नवी मुंबई क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता 1 ली ते 12 वी व नंतरचे सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्ती देणे.
|
6.
|
मनपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे.
|
विविध घटकाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजना आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.15 फेब्रुवारी 2020 पर्यंत विहीत नमुन्यात संबंधित विभाग कार्यालये / समाजविकास विभाग, बेलापूर भवन इमारत, 1 ला मजला, से. 11, सी.बी.डी., बेलापूर या ठिकाणी शासकीय व सार्वजनिक सुट्टया वगळून कार्यालयीन वेळेत कृपया जमा करावेत. अंतिम दिनांकानंतर प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणा-या योजनांचे महानगरपालिका क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.