सानपाडा विभागात श्री दत्त मंदिर मार्गासह तीन मार्गांची नामकरणे संपन्न

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तुर्भे प्रभाग क्र.74 सानपाडा येथे सेक्टर 6 मधील स्कायलाईट हॉटेल समोरील रस्त्याचे 'स्व. प्रल्हाद बामा ठाकूर मार्ग', प्रभाग क्र. 75 सानपाडा येथे सेक्टर 5 येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट ते अमन प्लाझा पर्यंत जाणा-या रस्त्याचे 'स्व. दत्ताराम भागोजी मिरगळ मार्ग' व सानपाडा रेल्वे स्टेशनजवळील चौकापासून श्री दत्त मंदिराकडे जाणा-या मुंबई पुणे महामार्गालगतच्या सेवा रस्त्याचे 'श्री दत्त मंदिर मार्ग' असे नामकरण समारंभ नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक श्री. सोमनाथ वास्कर व श्रीम. कोमल वास्कर, माजी परिवहन सदस्य श्री. विसाजी लोके आणि इतर मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on : 13-02-2020 11:18:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update