“थिंक बिग स्टेम प्रोग्राम”
नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विदयार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी तसेच त्यांच्या कौशल्य वृध्दी व्हावी, याकरिता मे.ॲमेझॉन यांच्या व्यावसायिक सामाजिक जाणिवेतून (CSR) अंतर्गत मे.लर्निंग लिन्क्स यांच्या संयुक्त विदयमाने “मोबाईल इनोवेशन स्टेशन” (VAN) नवी मुंबई क्षेत्रातील शाळांसाठी उपलब्ध करुन देण्यांत आली आहे. सदरची सुविधा नमुंमपा इयत्ता 6वी, 7वी व 8वी च्या विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देणेत आली आहे.
आज दिनांक 18/02/2020 रोजी शाळा क्रमांक 74, कोपरखैरणे येथे “थिंक बिग स्टेम प्रोग्राम” व “मोबाईल इनोवेशन स्टेशन” (VAN) यांचे उद्घाटन महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते मुख्यालयाच्या आवारात झेंडा दाखवून करण्यात आले. त्याप्रसंगी स्थायी समिती सभापती श्री. नवीन गवते, महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ, नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, नगरसेवक श्री. अविनाश लाड, श्री.रामचंद्र घरत, श्री. शंकर मोरे, स्विकृत नगरसेवक श्री. सुरज पाटील, शिक्षणाधिकारी श्री. नितिन काळे, व ॲमेझॉनच्या प्रतिनिधी श्रीम.गायत्री, श्रीम. उषा या उपस्थित होत्या. श्रीम. गायत्री यांनी सर्व उपस्थितांना “थिंक बिग स्टेम प्रोग्राम” व “मोबाईल इनोवेशन स्टेशन” (VAN) विषयी विस्तृत माहिती दिली.
सदर उपक्रम ॲमेझॉन व लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्या मदतीने विज्ञान व टेक्नॉलॉजी वर उत्सफुर्तपणे राबविला जात आहे. यामध्ये विदयार्थी स्वत: प्रयोग/प्रात्यक्षिक करतील. विदयार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति आत्मविश्वास वाढेल व स्पर्धेच्या युगात विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यणेस प्रवृत्त होतील असा विश्वास आहे.
Published on : 18-02-2020 13:48:27,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update