शिरवणे परिसरात सेवाभावी कार्य करणा-या व्यक्तींची नामकरणे संपन्न
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 81, शिरवणे येथील विविध मार्ग, चौक, मार्केट, सभागृह यांचा नामाकरण समारंभ नवी मुंबईचे महापौर तथा स्थानिक नगरसेवक श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी महपौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, ब प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. श्रध्दा गवस, नगरसेविका श्रीम. अनिता मानवतकर, माजी नगरसेविका श्रीम. माधुरी सुतार, डॉ. राजेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर श्री. जयवंत सुतार यांच्यामार्फत शिरवणे प्रभागातील मांडण्यात आलेल्या सर्वानुमते मंजूर ठरावानुसार ठाणे – बेलापूर रस्त्यापासून मातोश्री निवासाजवळून गणेश मंदिरापर्यंत जाणा-या रस्त्यास शिरवणे गावातील नामांकित सामाजित कार्यकर्ते कै.भालचंद्र उंदीर पाटील गणेशवाडी मार्ग, शिरवणे मार्केट इमारतीस शिरवणेगांव मार्केट, शिरवणे मासळी मार्केटचे महिला सक्षमीकरणासाठी त्याकाळी काम करणा-या सामाजिक कार्यकर्त्या कै.बनूबाई बळवंत घरत मासळी मार्केट, शिरवणेगाव मार्केट इमारतीत तळमजल्यावर बांधलेल्या भाजी मार्केटला नवी मुंबई वसण्यापूर्वीच्या कालखंडात शेती कामासाठी अवजारे बनविणारे कारागिर व कृषी संस्कृतीतील सामाजिक कार्यकर्ते कै.सिताराम बाळा ठाकूर भाजी मार्केट, शिरवणे गांव मार्केट इमारतीत पहिल्या मजल्यावरील सभागृहाचे माजी सरपंच कै. नथु गणा घरत सभागृह, शिरवणे गांव मार्केट इमारतीत दुस-या मजल्यावरील सभागृहास कै.नारायण सिताराम सुतार (सोनखार पोलीस पाटील) सभागृह, प्लॉट क्र. 33,132, 606 या ठिकाणी निर्माण झालेल्या चौकास माजी सरपंच कै. बुधाजी आंबो म्हात्रे चौक, प्लॉट क्र.194, 71, 678, 70 यामधून जाणा-या रस्त्यावरील चौकास ग्रामपंचायत सदस्य कै.गणपत महादू घरत चौक, भूखंड क्र. 33 व त्रिवेणी को. ऑप. हौ. सोसायटी, भूखंड क्र. 559 बी पासून जाणा-या रस्त्यास नामांकित पखवाज वादक व नाट्य कलावंत कै.रमेश दामू सुतार मार्ग अशी नामकरणे संपन्न झाली.
Published on : 26-02-2020 08:02:09,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update