कोपरखैरणे, तुर्भे, दिघा विभागात 2600 हून अधिक नागरिकांचे कोव्हीड 19 मास स्क्रिनींग
मास स्क्रिनींग उपक्रम राबवून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने आढळलेल्या भागात नागरिकांची कोव्हीड 19 विषयक तपासणी करण्याची विशेष मोहीम महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार मागील आठवडाभरापासून राबविण्यात येत आहे. आजही सेक्टर 5 कोपरखैरणे, सेक्टर 21 तुर्भे व ईश्वरनगर दिघा अशा 3 विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मास्क स्क्रिनींग शिबीर राबविण्यात आले. यामध्ये 2600 हून अधिक नागरिकांचे कोव्हीड 19 विषयक तपासणी करण्यात आली.
यामध्ये सेक्टर 5 कोपरखैरणे विभागात महापालिका नागरी आऱोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 344 नागरिकांची तपासणी केली व कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 4 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
सेक्टर 21 तुर्भे विभागातील कॅम्पमध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह तेरणा हॉस्पिटलच्या वैद्यकीय समुहाने 325 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले व कोरोना सदृष्य लक्षणे आढळलेल्या नागरिकाचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
ईश्वरनगर दिघा भागात महापालिका नागरी आरोग्य केंद्र यांच्यासह अमृत सेवाभावी संस्था यांच्या वैद्यकीय समुहाने 2027 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले. त्यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 4 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
या मास स्क्रिनींग कॅम्पमुळे नागरिकांची कोरोनाच्या अनुषंगाने विशेष तपासणी होत असून याचा उपयोग कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी होत आहे. उद्याही 6 जून रोजी सेक्टर 4 ऐरोली, महापेगांव व परिसर, सेक्टर 14 कोपरखैरणे, सानपाडा गांव सेक्टर 5 या 4 विभागात कोव्हीड 19 विशेष मास स्क्रिनींग मोहीम राबविली जाणार आहे.
नागरिकांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्याच्या दृष्टीने मास्कचा वापर नियमित करावा व सोशल डिस्टन्सींग पाळून कोरोनाचा संसर्ग रोखावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 05-06-2020 13:49:56,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update