ऐरोली, तुर्भे, नेरुळ भागात 5 ठिकाणी 1518 नागरिकांचे मास स्क्रिनींग

कोव्हीड - 19 च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना कोरोनाचा प्रसार हा संसर्गातून होत असल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस नियोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत सापडलेल्या भागांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
या अनुषंगाने सेक्टर 10 नेरुळ, यादवनगर ऐरोली, सेक्टर 16 ऐरोली, सेक्टर 19 ऐरोली, हनुमान नगर तुर्भे या 5 ठिकाणी मास स्क्रिनींग हाती घेण्यात आले असून नागरिकांसाठी कोव्हीड-19 विशेष तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 1518 नागरिकांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली व कोरोना सदृष्य लक्षणे दिसणा-या 19 नागरिकांची स्वॅब टेस्टींग करण्यात आली.
यामध्ये सेक्टर 10 नेरुळ परिसरात मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 253 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले. तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 03 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे यादवनगर ऐरोली विभागात महापालिका नागरी आऱोग्य केंद्रासह तेरणा हॉस्पिटलच्या वैद्यकीय समुहाने 3775 नागरिकांची तपासणी केली तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 04 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
अशाच प्रकारे ऐरोली सेक्टर 19 विभागातील परिसरात मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 168 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले. तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 08 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
तसेच ऐरोली विभागात सेक्टर 16 येथे मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 140 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले. तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 4 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
हनुमाननगर, तुर्भे भागात महापालिका नागरी आरोग्य केंद्र यांच्यासह अमृत प्रेरणा सेवाभावी संस्था यांच्या वैद्यकीय समुहाने 580 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले.
उद्या दि. 12 जून रोजी राबाडे, गोठीवली, नोसिल नाका व सेक्टर 5 ऐरोली या 4 ठिकाणी कोव्हीड-19 विशेष वैद्यकीय तपासणी मोहीम राबविली जाणार आहे.
नवी मुंबई शहरातील कोरोनाची साखळी खंडीत कऱण्यासाठी विशेषत्वाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जास्त प्रमाणात सापडलेल्या भागांमध्ये स्पेशल मास स्क्रिनींग कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनीही संसर्गातून पसरणारा कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी घरातच थांबावे आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 11-06-2020 17:31:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update