नोसिल नाका, राबाडेगांव, गोठिवलीगांव व घणसोली मध्ये 815 नागरिकांची कोव्हीड-19 तपासणी

कोरोना बाधीत नागरिक मोठ्या प्रमाणात असलेल्या विभागांकडे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात येत असून 26 मे पासून विविध विभागात मास स्क्रिनींग कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत.
आज 13 जून रोजीही 12 जून प्रमाणेच नोसिल नाका, राबाडे गांव, गोठिवली गांव परिसरात तसेच नव्याने चिंचआळी घणसोली परिसरात घेण्यात आलेल्या कोव्हीड 19 मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये 815 नागरिकांची तपासणी करण्यात आली तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 16 नागरिकांचे त्वरीत स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
यामध्ये नोसिल नाका परिसरात मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 200 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले. तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 08 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
राबाडेगांव याठिकाणी महापालिका नागरी आऱोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 115 नागरिकांची तपासणी केली तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 03 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
तसेच गोठिवलीगांव येथे मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने 189 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले. तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 5 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
त्याचप्रमाणे चिंचआळी घणसोली येथे मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह तेरणा हॉस्पिटलच्या वैद्यकीय समुहाने 311 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले.
सोमवार 15 जून रोजी बेलापूर विभागातील दिवाळेगांव व आग्रोळीगांव तसेच घणसोलीगांव या 3 ठिकाणी कोव्हीड 19 मास स्क्रिनींग कॅम्प राबविण्यात येत आहेत.
कोरोनाची वाढणारी साखळी खंडीत करण्यासाठी मास स्क्रिनींग ही प्रभावी उपाययोजना ठरताना दिसत असून या शिबीरांना सर्वच विभागांमध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तरी प्रत्येक नागरिकाने मास्कचा नियमित वापर करणे तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन करून कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवावे आणि आपले नवी मुंबई शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी व्यक्तिगत पुढाकार घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 13-06-2020 11:48:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update