विशेष प्रतिबंधित क्षेत्रांत 7 दिवसांत 37841 घरांतील 1 लाखांहून अधिक नागरिकांचे मास स्क्रिनींग

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विविध उपाययोजना राबवित असताना ज्या भागामध्ये 10 जूनपासून मोठया प्रमाणावर कोरोनाबाधित सापडले आहेत. अशा 10 भागांमध्ये (दिवाळेगाव, करावेगाव, तुर्भे स्टोअर, सेक्टर 21 तुर्भे, सेक्टर 22 तुर्भेगाव, सेक्टर 11 जुहूगाव वाशी, सेक्टर 12 खैरणे-बोनकोडेगांव, सेक्टर 19 कोपरखैरणेगांव, राबाडेगांव, चिंचपाडा ऐरोली) 29 जून पासून तसेच 2 भागांमध्ये (सेक्टर 1 ते 9 सीबीडी बेलापूर व वाशीगांव) 30 जूनपासून विशेष प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात येऊन त्या ठिकाणी 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या क्षेत्रात महापालिका आयुक्त् श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाची साखळी खंडित करण्याकरीता घरोघरी जाऊन मास स्क्रिनिंग मोहिम राबविण्यात आली आहे.
या 12 विशेष प्रतिबंधात्मक क्षेत्रांत 37841 घरांपर्यंत पोहोचून मास स्क्रिनिंग मोहिम राबविण्यात आली असून त्यामध्ये 1 लाख 3 हजार 959 व्यक्तींची कोव्हीड-19 विषयक तपासणी करण्यात आली आहे.
क्षेत्र
|
मास स्क्रिनींग
घरे संख्या
|
मास स्क्रिनींग
व्यक्ती संख्या
|
चिंचपाडा, ऐरोली
|
4900
|
9063
|
कोपरखैरणेगांव सेक्टर 19
|
5005
|
15786
|
राबाडेगांव
|
1430
|
3297
|
खैरणे बोनकोडे गाव
|
2987
|
5572
|
करावेगांव
|
4625
|
16690
|
तुर्भे स्टोअर
|
5037
|
16926
|
सेक्टर 21, तुर्भे
|
2689
|
7813
|
जुहूगांव
|
2151
|
4328
|
सेक्टर 22, तुर्भेगांव
|
1378
|
5317
|
वाशीगाव
|
4056
|
11428
|
दिवाळे गाव
|
215
|
682
|
खैरणेगाव
|
3368
|
7057
|
एकूण
|
37841
|
103959
|
या मास स्क्रिनींगमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, कर्करोग, किडनीचे विकार अशा प्रकारे इतर दीर्घकालीन आजार असणाऱ्या व्यक्तींची वेगळी नोंद करण्यात आली असून या व्यक्तींकडे विशेष लक्ष ठेवले जात आहे.
मोठया प्रमाणात कोरोनाबाधित सापडलेल्या इतर भागातही मास स्क्रिनींग राबविण्याचा आयुक्तांचा निर्णय
यानंतर 3 जुलै रोजी, रात्री 12 वाजल्यापसून 13 जुलै रोजी, रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून या मोठया प्रमाणावर कोरोनाबाधित आढळलेल्या 12 विशेष प्रतिबंधित क्षेत्रातील कालावधी संपुष्टात आल्यानंतर यापुढील काळात इतर कोरोनाबाधित मोठया संख्येने सापडलेल्या इतर भागातही घरोघरी जाऊन मास स्क्रिनिंग मोहिम राबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त् श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतला आहे व त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
या मास स्क्रिनींगमधून कोरोना संशयित सापडून त्यांचे विलगीकरण करणे शक्य होत असून त्यांच्यामुळे त्यांच्या निकटवर्तींयांना लागण होण्याचा संभाव्य धोका टाळला जात आहे तरी सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी आपापल्या घरीच थांबून लॉकडाऊनचे पालन करावे व कोरोनाची साखळी खंडीत करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
Published on : 06-07-2020 14:24:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update