एस.एस.सी. परीक्षेत इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रातील दिव्यांग मुलांचे घवघवीत यश
.jpeg)
दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रातील कर्णबधीर, अंध, अध्ययन अक्षम, मतिमंद व बहुअपंगत्व अशा सर्व विभागातील दहावीची परीक्षा देणा-या दिव्यांग मुलांनी घवघवीत यश मिळवले आहे व दिव्यांगत्व असले तरी शैक्षणिक प्रगतीत आपण कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. यातील काही दिव्यांग मुले ही सन 2007 पासून इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रांमध्ये शिकत आहेत. तर काही दिव्यांग मुले सामान्य शाळेत शिकत असून त्यांना केंद्रामधून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे काही दिव्यांग मुले ही इतर शाळांमधून etc केंद्रात प्रवेशित झालेली आहेत.
एकूण 29 दिव्यांग मुले S.S.C. उत्तीर्ण झाले असून कर्णबधीर विभागातून इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांसह दहावीसाठी प्रवेश घेत विशाल ठाकरे (80%), श्रेया शिंदे (75%), आशीष सल्ला (59%), यांनी यश संपादन केले आहे. याचसोबत कर्णबधीर विभागातून प्रीती कवडे, शशांक साळुंखे, प्रथमेश पवार, संदेश मोरे, नेहा बनसोडे, सिद्धेश बोत्रे, साई शिरिस्कर, भरत परमार तसेच शिंपी मौर्या, चांदबीबी हश्मी, विकास गुप्ता, मेहेक गौर, फिरोज अन्सारी, सुरेश पटेल, पूजा सुतार, अंकीत विश्वकर्मा, नीतेश दुबे यांनीही सुयश प्राप्त केले आहे. या मुलांनी शैक्षणिक अभ्यासासोबत इतर अभ्यासेतर उपक्रमातही सहभाग घेतला होता. यातील साई शिरीस्कर या विदयार्थ्यांने राज्यस्तरीय अभिनय स्पर्धेतही यश मिळवले होते. साक्षी वाघ या दिव्यांग मुलीने बहुविकलांग असूनही 92% गुण मिळवले ही खूप गौरवास्पद बाब आहे. तसेच मिहिर कांबळे (इंग्रजी माध्यम) व लोकेश दातखिळे (मराठी माध्यम) या अल्पदृष्टी असणा-या मुलांनीही यश संपादन केले आहे. हि दोन्ही दिव्यांग मुले सामान्य शाळेत शिक्षण घेत असून त्यांना अधिक अभ्यासक्रमासाठी ETC' केंद्रामधून विशेष शिक्षण अंध विभागातून देण्यात येत होते. त्याचप्रमाणे मनाली सुर्यवंशी, हर्षदा खांडरे, स्नेहल पवार, व कृष्णा पांचाळ या मतिमंद विभागातील दिव्यांग मुलांनी उत्तम यश संपादन केले आहे. यापैकी कृष्णा पांचाळ याने अतिशय गरिबीच्या परिस्थितीमध्येही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 68% मिळवले आहेत. तसेच अध्ययन अक्षमता विभागातील ध्रुव सुरी याने 80% तर गर्वित अरोरा याने 70% मिळवले आहेत.
दिव्यांग मुलांच्या सर्वसमावेशित शिक्षणावर ETC केंद्राचा नेहमीच भर राहिला असून प्रवेशित मुले त्यांना वेळोवेळी सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन देण्यात आलेले आहे. त्यामुळेच सर्व दिव्यांग मुलांच्या पालकांनी मुलांच्या यशाबाबत आनंद व्यक्त केला आहे. तसेच या यशात इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राचा खूप मोठा हात असल्याचे आवर्जून सांगितले आहे.
मुलांच्या या यशामध्ये ETC केंद्रातील विशेष शिक्षक व सहशालेय शिक्षकांची मोठी मेहनत आहे. वेळोवेळी या विशेष मुलांना थेरपी प्रशिक्षण विविध थेरपिस्ट मार्फत देण्यात आले तसेच मुलांना प्रोत्साहित करणे त्यांच्या पालकांना मार्गदर्शन, समुपदेशन करण्याचे काम केंद्रातील मानसशास्त्रज्ञांनी केले आहे. तसेच या दिव्यांग मुलांनी एस.एस.सी. मध्ये सुयश मिळवल्यामुळे पुढील महाविद्यालयीन शिक्षणाकरीता त्यांना योग्य साखा निवडणे याकरीता ऑनलाईन मार्गदर्शन ईटीसी केंद्रामार्फत करण्यात येणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद असून या सर्वांच्या यशाबद्दल महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी विशेष कौतुक केले असून या गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांचे शिक्षक, पालकांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.
इटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या संचालक डॉ. वर्षा भगत यांनी या मुलांच्या यशाबाबत समाधान व्यक्त केले असून आहे दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी हे यश महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Published on : 29-07-2020 17:08:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update