दीड दिवसांच्या विसर्जन सोहळयात 6438 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 23 पारंपारिक विसर्जन स्थळांसोबत यावर्षी कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी135 कृत्रिम विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेच्या वतीने सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या चोख विसर्जन व्यवस्थेत दीड दिवसानंतर होणारे श्रीगणरायाच्या 6438 मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या संपन्न झाले.
महापालिका क्षेत्रातील 23 पारंपारिक विसर्जन स्थळांवर 3185 घरगुती व 28 सार्वजनिक अशा दीड दिवसांच्या 3213 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन संपन्न झाले. यामध्ये बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 824 घरगुती व 6 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 650 घरगुती व 4 सार्वजनिक, वाशी विभागातील 2 विसर्जन स्थळांवर 330 घरगुती व 2 सार्वजनिक, तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 241 घरगुती व 3 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 23 घरगुती, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 699 घरगुती व 5 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 415 घरगुती व 2 सार्वजनिक आणि दिघा विभागात 1 विसर्जन स्थळावर 3 घरगुती व 6 सार्वजनिक अशा एकुण 3185 घरगुती व 28 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 3213 श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
यावर्षी पारंपारिक 23 विसर्जन स्थळांव्यतिरिक्त कोव्हीड 19 साथरोगाची परिस्थिती विचारात घेता गर्दी पूर्णत: टाळली जावी व सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे यादृष्टीने साधारणत: 6 पट अधिक म्हणजेच 135 कृत्रिम विसर्जन तलाव विभागवार तयार करण्यात आले आहेत. या कृत्रिम विसर्जन स्थळांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये - बेलापूर विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 347 घरगुती व 7 सार्वजनिक, नेरूळ विभागात – 27 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 348 घरगुती व 2 सार्वजनिक, वाशी विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 387 घरगुती व 11 सार्वजनिक, तुर्भे विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 318 घरगुती व 20 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात – 14 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 746 घरगुती व 30 सार्वजनिक, घणसोली विभागात - 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 372 घरगुती व 18 सार्वजनिक, ऐरोली विभागात – 22 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 391 घरगुती व 17 सार्वजनिक व दिघा विभागात – 7 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 191 घरगुती व 20 सार्वजनिक अशाप्रकारे तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आलेल्या एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 3100 घरगुती व 125 सार्वजनिक अशा एकूण 3225 श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
अशाप्रकारे दीड दिवसांच्या विसर्जन प्रसंगी 6285 घरगुती, 153 सार्वजनिक अशा एकूण 6 हजार 438 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 23 विसर्जन स्थळांपैकी मुख्य 14 तलावांमधील गॅबियन वॉलच्या विशिष्ट क्षेत्रात श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करून पर्यावरण संरक्षण - संवर्धन कार्यात भाविकांनी आपले योगदान दिले. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी कृत्रिम विसर्जन तलावात विसर्जन करावे अशा केलेल्या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. लाईफगार्डस्, स्वयंसेवक यांच्यासह अग्निशमन दलही कार्यरत होते. श्रीमूर्तींच्या सुयोग्य विसर्जनासाठी तराफ्यांसह आवश्यक तेथे फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्य विसर्जनस्थळांवर पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचाराची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती.
मुख्य व कृत्रिम अशा सर्व विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. विसर्जनस्थळी जमा होणाऱ्या निर्माल्याची वाहतुक स्वतंत्र वाहनाव्दारे करण्यात येत असून निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा सर्वच ठिकाणी अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती. यापुढील काळातील श्रीगणेश विसर्जन अशाच प्रकारे सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी आठही विभाग कार्यालय पातळीवर सर्व यंत्रणा सुसज्ज असणार आहे.
Published on : 24-08-2020 15:11:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update