पाचव्या दिवसाच्या विसर्जन सोहळ्यात 3294 श्रीगणेशमुर्तींचे भावपूर्ण विसर्जन कृत्रिम तलावातील विसर्जनाला नागरिकांची पसंती - 'कोपरखैरणे ठरला कृत्रिम तलावांचा नवी मुंबई पॅटर्न'
दीड दिवसाप्रमाणेच पाचव्या दिवशीही 22 मुख्य. विसर्जनस्थळे व 135 कृत्रिम विसर्जनस्थळांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सुयोग्य नियोजनामध्ये 3264 घरगुती आणि 30 सार्वजनिक अशा एकूण 3294 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कोव्हीड 19 च्या कालावधीत संपन्न होत असलेल्या यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवात नवी मुंबईकर नागरिकांनी शासन, प्रशासनाने केलेल्या आवाहनास अनुसरून स्वयंशिस्तीचे पालन करीत जागरूक व जबाबदार नागरिकत्वाचे सर्वच विसर्जन स्थळांवर दर्शन घडविले.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने बनविण्यात आलेल्या विभागाविभागातील आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य देत नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन केलेच शिवाय पर्यावरणपूरक संदेशही स्वत:च्या कृतीतून दिला, कोपरखैरणे तलावाठिकाणी तर मुख्य विसर्जन तलावामध्ये केवळ 3 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नागरिकांनी मुख्य विसर्जन तलावाच्या बाजूच्या कृत्रिम तलावात विसर्जत करण्यास पसंती दिल्याचे चित्र दीड दिवसांच्या विसर्जन सोहळ्याप्रमाणेच पाचव्या दिवशीही पहायला मिळाले. 135 कृत्रिम तलावात 1993 घरगुती तसेच 22 सार्वजनिक अशा एकूण 2015 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
पाचव्या दिवसाच्या विसर्जनामध्ये -
बेलापूर विभागात – 5 विसर्जन स्थळांवर 343 घरगुती व 4 सार्वजनिक,
नेरूळ विभागात – 2 विसर्जन स्थळांवर 315 घरगुती व 2 सार्वजनिक,
वाशी विभागात – 2 विसर्जन स्थळांवर 128 घरगुती व 1 सार्वजनिक,
तुर्भे विभागात – 3 विसर्जन स्थळांवर 117 घरगुती व 1 सार्वजनिक,
कोपरखैरणे विभागात – 2 विसर्जन स्थळांवर 3 घरगुती,
घणसोली विभागात - 4 विसर्जन स्थळांवर 145 घरगुती,
ऐरोली विभागात – 3 विसर्जन स्थळांवर 220 घरगुती, आणि
दिघा विभागात – 1 विसर्जन स्थळांवर 0 घरगुती
अशाप्रकारे एकुण 22 विसर्जन स्थळांवर 1271 घरगुती व 8 सार्वजनिक अशा एकूण 1279 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
त्याचप्रमाणे, यावर्षी मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळांवर ,
बेलापूर विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 99 घरगुती,
नेरूळ विभागात – 27 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 156 घरगुती,
वाशी विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 142 घरगुती व 6 सार्वजनिक,
तुर्भे विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 197घरगुती व 5 सार्वजनिक,
कोपरखैरणे विभागात – 14 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 746 घरगुती व 12 सार्वजनिक,
घणसोली विभागात - 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 406 घरगुती व 01 सार्वजनिक,
ऐरोली विभागात – 22 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 155 घरगुती, आणि
दिघा विभागात – 7 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 92 घरगुती
तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आलेल्या एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1993 घरगुती व 22 सार्वजनिक अशा एकूण 2015 श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
अशाप्रकारे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाचव्या दिवशी 3264 घरगूती व 30 सार्वजनिक अशा एकूण 3294 श्रीगणेशमूर्तींचे भक्तीपूर्ण विसर्जन संपन्न झाले.
श्रीमूर्ती विसर्जनाकरिता महानगरपालिका आठही विभाग कार्यालयांच्या वतीने संपूर्ण व्यवस्था नियोजनबध्दरित्या कार्यरत होती. विभागातील अधिकारी – कर्मचारी यांच्यासह अग्निशमन विभाग आणि विसर्जनासाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक, लाईफ गार्डस् यांच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पडली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख होता.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापुढील काळातील गौरींसह होणारे श्रीगणेशमुर्ती विसर्जन, सात दिवसांचे तसेच अनंतचतुर्दशीदिनी होणारे विसर्जन याप्रसंगीही अशाचप्रकारे नियोजन करण्यात आलेले असून विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेस संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 27-08-2020 13:06:46,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update