सातव्या विसर्जनदिनीही कृत्रिम तलावांना उत्तम प्रतिसाद देत 1665 श्रीगणेशमूर्तींचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन
श्रीगणेशोत्सवातील सातव्या विसर्जनदिनीही कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाला पसंती देत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आठही विभागात 1649 घरगुती व 16 सार्वजनिक अशा एकूण 1665 श्रीमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन संपन्न झाले. यामध्ये 22 पारंपारिक मुख्य विसर्जनस्थळांवर 674 श्रीगणेशमूर्तींचे व 135 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 991 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये,
मुख्य 22 विसर्जन स्थळांमधील -
बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 88 घरगुती व 2 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 187 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 47 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 109 घरगुती व 01 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात 2 विसर्जनस्थळांवर 26 घरगुती, 01 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 119 घरगुती व 01 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 93 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
अशाप्रकारे एकूण 21 विसर्जन स्थळांवर 669 घरगुती व 5 सार्वजनिक अशा एकूण 674 श्री गणेश मुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
त्याचप्रमाणे, यावर्षी कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गर्दी टाळण्याकरिता मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेल्या 135 कृत्रिम विसर्जन स्थळांवर,
बेलापूर विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 16 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात – 27 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 81 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 18 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 176 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात – 14 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 208 घरगुती व 01 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात - 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 253 घरगुती व 06 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात – 22 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 117 घरगुती व 2 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
दिघा विभागात – 7 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 111 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती
अशाप्रकारे एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 980 घरगुती व 11 सार्वजनिक अशा एकूण 991 श्रीगणेशमुर्तींचे भक्तीमय निरोप देत विसर्जन करण्यात आले.
दिघा विभागामध्ये पारंपारिक मुख्य विसर्जन स्थळावर एकही श्रीमूर्ती विसर्जन न करता, नागरिकांनी घराजवळच्या कृत्रिम विसर्जन तलावांना पसंती देत महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. कोपरखैरणे विभागामध्ये यापूर्वीप्रमाणेच पारंपारिक विसर्जन तलावांपेक्षा कृत्रिम तलावातील विसर्जनाला नागरिकांनी प्रथम पसंती दिली. अशाप्रकारे सर्वच विभागात चित्र दिसून आले. यामधून गर्दी टाळली जाऊन कोव्हीडचा प्रसार रोखण्यात नागरिकांनी मोलाची भूमिका बजावली व त्यासोबतच पर्यावरण संरक्षणही केले.
कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांच्या श्रीगणेशमूर्ती संकलनासाठी महानगरपालिकेमार्फत श्रीगणेशमूर्ती संकलन वाहन ठेवण्यात आले होते. नागरिकांनी या उपक्रमासही चांगला प्रतिसाद देऊन या वाहनातील स्वयंसेवकांकडे आपल्या श्रीगणेशमूर्ती प्रदान केल्या. या श्रीमूर्तींचे विधीवत विसर्जन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.
सर्व विसर्जन स्थळांवर विभाग कार्यालयाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांचेसह स्वयंसेवकांची आणि मुख्य विसर्जन स्थळांवर लाईफ गार्ड्सची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासोबतीने अग्निशमन विभाग तसेच आरोग्य विभागाचेही पथक तयार होते. सर्व मुख्य ठिकाणी नवी मुंबई पोलीस दक्षतेने कार्यरत होते. यावर्षी मिरवणूका नसल्याने व मर्यादित भाविकच श्रीमूर्तींसमवेत विसर्जनासाठी येत असल्याने नागरिकांच्या संपूर्ण सहयोगात सातव्या दिवसाचाही विसर्जन सोहळा भक्तीमय वातावरणात शांततेने पार पडला.
आता अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणावर होणा-या विसर्जन सोहळ्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वोतोपरी नियोजन केले असून नागरिकांनी अशाच प्रकारे संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 30-08-2020 13:33:23,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update