नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे जाहीर आवाहन
दि. 10 नोव्हेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे मार्फत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील 100/22KV सब स्टेशनचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असुन त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात मंगळवार दि. 10 नोव्हेंबर 2020 रोजी पाणी पुरवठा संध्याकाळी होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसेच बुधवार दि. 11 नोव्हेंबर 2020 रोजी कमी वेळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नोंद घ्यावी.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.
Published on : 09-11-2020 11:18:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update