*डिसेंबर महिन्यात रूग्णदुपटीचा कालावधी पावणेदोन वर्षावर* *केवळ 1.74 टक्के रूग्णच ॲक्टिव्ह* *कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा धोका लक्षात घेऊन आरोग्य त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना त्याला लाभलेली नागरिकांचा साथ यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी घट तशीच कायम राहिल्याचे चित्र दिसून येत असून दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा 7 डिसेंबरपासून एखादा दुसरा अपवाद वगळता दोन आकडी संख्येवर आल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र असे काहीसे समाधानकारक चित्र असले तरी करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही हे लक्षात घेऊन सर्वोतोपरी काळजी घेण्याची गरज आहे. त्यातच ब्रिटनमध्ये जनुकीय रचनेत बदल झालेला करोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आढळलेला असून या विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो हे तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊन तर अधिक खबरदारी बाळगणे आत्यंतिक गरजेचे आहे.
त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून दिवाळीनंतर वाढविण्यात आलेल्या चाचण्यांच्या प्रमाणात खंड पडू न देता डिसेंबर महिन्यात चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात 72771 चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यात वाढ करीत डिसेंबर महिन्यात 80624 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. या चाचण्यांमध्ये 2751 नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून *डिसेंबर महिन्यातील एकूण चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) कमी होऊन 3.41% इतकेच आहे.* अशाप्रकारे कोरोना वाढीचा वेग काहीसा नियंत्रित दिसत असला तरी नागरिकांनी सुरक्षेच्या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 31 डिसेंबरपर्यंत एकूण 51002 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यापैकी 49060 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व 1051 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. *नवी मुंबईतील कोरोनामुक्त होण्याचे 96.19 % हे प्रमाण आणि मृत्यूदराचे 2.06 % हे प्रमाण इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत चांगले आहे.*
ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोनातून बरे होणा-या रूग्णांचे प्रमाण वाढत असलेले दिसून येत असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस 49060 रूग्ण बरे होऊन घरी परतले (96.19 %) आहेत.
रूग्णदुपटीच्या कालावधीतही (Doubling Rate) लक्षणीय वाढ झालेली असून 30 नोव्हेंबरपर्यंत 263 दिवसांवर पोहचलेला रूग्णदुपटीचा कालावधी (Doubling Rate) 31 डिसेंबरपर्यंत 624 दिवस (पावणेदोन वर्षे) इतका झालेला आहे*.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्याही आता तीन आकड्यांमध्ये आलेली असून *31 डिसेंबर रोजी 891 (1.74 %) इतकेच कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत ॲक्टिव्ह आहेत. 30 नोव्हेंबरच्या तुलनेत (1605 रूग्ण, 3.32 %) प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे.*
नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना बाधितांना सुयोग्य उपचार होण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केलेली असून *नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवरील कोव्हीड उपचारार्थ बेड्सची आकडेवारी तपासली असता एकूण 5965 बेड्सपैकी नवी मुंबई बाहेरील कोरोनाबाधित रूग्ण मोठ्या संख्येने येथे उपचारार्थ दाखल असले तरी 4983 बेड्स उपलब्ध असल्याचे दिसत आहे.*
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आरोग्य सुविधा वाढीवर भर देत कोरोना बाधितांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आयसीयू बेड्सचे योग्य नियोजन करण्यात आले. *5 महिन्यांच्या कालावधीत त्यापूर्वी उपलब्ध आरोग्य सुविधांत तिपटीने वाढ करण्यात आलेली आहे. ऑक्टोबरपासून रूग्णसंख्या कमी होत चालल्याने महानगरपालिकेच्या 10 कोव्हीड केअर सेंटरमध्ये व 2 डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये रूग्ण दाखल करणे तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आले असले तरी गरज भासली तर केवळ 2 दिवसांत ती केंद्रे पुन्हा कार्यान्वित करता येऊ शकतील अशा प्रकारचे नियोजन करण्यात आलेले आहे.सध्या केवळ सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोव्हीड रूग्णालयात तसेच डॉ.डी.वाय.पाटील रूग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार होत आहेत व त्याठिकाणची व्यवस्था त्यासाठी पुरेशी आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनवरून परतलेल्या प्रवाशांच्या विलगीकरणाची व्यवस्था एमजीएम रूग्णालय सानपाडा येथे करण्यात आलेली आहे. *
*कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असली तरी पहिल्या टप्प्यात ती आरोग्यकर्मींना दिली जाणार आहे. ती लस सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यास अद्याप बराच अवधी असल्याने मास्कचा नियमित वापर, सतत हात धुणे व एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे हीच कोरोनापासून बचावाची त्रिसूत्री असून एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने स्वत:चे व इतरांचे रक्षण करण्यासाठी खबरदारी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.*
महिना
|
टेस्ट
|
आरटीपीसीआर
|
अँटिजेन
|
पॉझिटिव्ह
|
डिस्चार्ज
|
मृत्यू
|
ॲक्टिव्ह
|
1 ते 4 जाने. 2021
|
6612
|
3070
|
3542
|
314
|
287
|
09
|
909
(4 जाने.)
|
Published on : 05-01-2021 12:34:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update