ओल्या कच-यापासून खतनिर्मिती व प्लास्टिकवर पुनर्प्रक्रियेचे काम करणा-या संस्थांना आवाहन
'स्वच्छ सर्वेक्षण-2021' च्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच शासकीय, निमशासकीय, अशासकीय संस्था आणि शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सार्वजनिक उपक्रम, कंपनी, नर्सिंग होम, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, क्रीडा संकुले व इतर वाणिज्य संस्थांमध्ये 50 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होत आहे अशा ठिकाणी कचरा वर्गीकरण करुन, त्यातील ओल्या कचऱ्याची आपल्या स्तरावर खत निर्मिती करुन, विल्हेवाट लावणेबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे.
त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती व प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करण्याचे काम करण्यास कोणतीही अशासकीय संस्था इच्छुक असेल तर त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचेशी दूरध्वनी क्रमांक 022 - 27567250 / 27567251 यावर अथवा dmc_swm@nmmconline.com या ई मेलवर संपर्क साधावा किंवा सेक्टर 15, सीबीडी बेलापूर येथे महापालिका मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावरील घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये प्रत्यक्ष येऊन तसा लेखी प्रस्ताव सादर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 21-01-2021 10:18:55,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update