जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा, व्याख्याने यांचे ऑनलाईन आयोजन
8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने 8 ते 15 मार्च या सप्ताहामध्ये स्त्री शक्तीचा जागर करीत सध्या कोरोनाबाधितांची पुन्हा वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन विविध ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये 18 वर्षावरील महिलांकरीता आयोजित करण्यात आलेल्या Online स्पर्धांमध्ये - (1) बेस्ट ऑफ वेस्ट – टाकाऊपासून टिकाऊ (पर्यावरणपूरक वस्तू) - घरातील टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरणपूरक वस्तू बनवणे स्पर्धा, (2) किचन / टेरेस गार्डनींग - घरातील किचन, बाल्कनी किवा गच्चीवर विकसित केलेली बागकाम स्पर्धा, (3) स्त्रीशक्तीवर आधारित जनजागृतीपर चारोळी किंवा कविता स्पर्धा, (4) क्रिएटिव्ह रांगोळी स्पर्धा, (5) नवी मुंबई हास्यसम्राज्ञी विनोदी अभिनय स्पर्धा, (6) सलाड सजावट स्पर्धा, (7) एकपात्री अभिनय स्पर्धा अशा 7 विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांमधील सहभागाकरिता नोंदणी करण्याची लिंक दि. 11 मार्च 2021 रोजी सायं. 6 वाजेपर्यंत खुल्या असणार आहेत. स्पर्धा सहभागकरिता अर्ज, नियम, अटी व शर्ती याची सविस्तर माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे फेसबुक पेज @NMMConline यावर उपलब्ध असून स्पर्धकांनी व्हॉट्स ॲप क्रमांक 9833540864 यावर त्यांची स्पर्धेकरिता तयार केलेली व्हिडीओ क्लिप / फोटो पाठवावयाची आहे. या स्पर्धांमध्ये दिघा ते सीबीडी बेलापूर या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणा-या महिला सहभाग घेऊ शकतात. याची स्पर्धकांनी नोंद घ्यावयाची आहे.
याशिवाय महिलांसंबंधी विविध विषयांवर निगडीत व्याख्यानांचे सप्ताहभर ऑनलाईन आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये - (1) दि. 8/3/2021 रोजी 4 वा. - स्त्रियांमधील संप्रेरके व मानसिक स्थिती आणि व्यंध्यत्व व आयव्हीएफ तंत्रज्ञान या विषयावर डॉ. नंदिता पालशेतकर महिलांशी फेसबुक लाईव्ह संवाद साधणार आहेत. त्यानंतर, (2) दि. 9/3/2021 - योग, आरोग्य आणि आजची स्त्री, (3) 10/3/2021 - महिलांचे अर्थकारण, (4) दि. 11/3/2021 - जाणत्वे मातृत्व, (5) दि. 12/3/2021 - व्यक्तीगत आणि व्यावसायिक जीवनात महिलांचा समतोल, (6) दि. 13/3/2021 - महिला सक्षमीकरण आणि स्वत:चा शोध, (7) दि. 14/3/2021 - जपूया स्त्रीत्व 8) 15/3/2021 - महिला आणि स्वसंरक्षण या विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांची ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्यात आलेली आहेत. तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या @NMMConline या फेसबुक पेजला भेट देऊन महिला या उद्बोधक व्याख्यानांचा लाभ घेऊ शकतात.
तरी जागतिक महिला दिनानिमित्त विविध अंगभूत गुणांना वाव देणा-या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याकरीता महिलांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या @NMMConline या फेसबुक पेजला भेट देऊन स्पर्धांची माहिती जाणून घ्यावी व स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 05-03-2021 16:00:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update