*आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रीयेतून मोठ्या प्रमाणावर डॉक्टर, नर्सेस उपलब्धता*

कोव्हीडचा प्रभाव रोखण्यासाठी रुग्णालयीन सुविधांमध्ये वाढ केली जात असताना त्याठिकाणी वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याकडेही लक्ष देण्यात येत आहे. त्याकरिता प्रसिध्द करण्यात आलेल्या डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्यकर्मींच्या कंत्राटी (करार) पध्दतीने भरती करावयाच्या पदांकरीता जाहीरात प्रसिध्द करण्यात आली असून त्याला इच्छुक उमेदवारांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.
दि. 05 एप्रिल रोजी 51 डॉक्टरांसह एकूण 236 आरोग्यकर्मी महानगरपालिकेस मिळाले असून आज सलग दुस-या दिवशीही महापालिका मुख्यालय आणि विष्णुदास भावे नाट्यगृह याठिकाणी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली. आजच्या दिवशीही 51 डॉक्टर्स, 205 स्टाफनर्स, 21 ऑक्झिलरी नर्स तसेच 5 लॅब टेक्निशियन व 2 ज्युनियर लॅब टेक्निशियन भरतीसाठी पात्र ठरलेले आहेत. सातत्याने दोन दिवस आरोग्य विभागासाठी प्रतिमहा ठोक मानधनावर कंत्राटी (करार) पध्दतीने भरती प्रक्रियेस चांगला प्रतिसाद मिळालेला असून उद्याही ही प्रक्रिया सुरु असणार आहे.
Published on : 06-04-2021 15:36:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update