*ऐरोली विभागात अतिक्रमण विभागाची अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे यावर धडक कारवाई करण्यात येत असून ऐरोली विभागामध्ये सेक्टर 3 येथील जे-162 व ए-07 याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता इमारतीचे अनाधिकृतपणे बांधकाम सुरू होते. या बांधकामास ऐरोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. नोटीशीस अनुसरून हे अनाधिकृत बांधकाम संबंधितांनी स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी अनाधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.
या अनाधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन हे अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. कोपरखैरणे विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी 6 मजूर, 1 गॅस कटर, 2 इलेक्ट्रीक हॅमर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीसांसह ही मोहिम राबविण्यात आली.
यापुढील काळात अशाप्रकारची अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 15-06-2021 15:39:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update