बेलापूर विभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर विभागातील सेक्टर 36, करावेगांव येथे महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधकाम सुरू होते. या अनधिकृत बांधकामास बेलापूर विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. नोटीशीस अनुसरून हे अनाधिकृत बांधकाम संबंधितांनी स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी अनाधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते.
सदर अनधिकृत बांधकामांवर बेलापूर विभागामार्फत धडक मोहीमेचे आजोयन करण्यात आलेले होते. त्यानुसार दोन्ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहीमेसाठी बेलापूर विभागातील अधिकारी / कर्मचारी, 20 मजूर, 1 गॅस कटर, 2 इलेक्ट्रीक हॅमर, 1 जेसीबी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते. यापुढील कालावधीतही कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 18-06-2021 15:14:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update