*नर्सेस करिता प्रशासकिय कामकाजाचे व महिलांविषयक कायद्याचे विशेष प्रशिक्षण*
आपण करीत असलेल्या कामामध्ये अद्ययावत राहणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागातील कर्मचा-यांसाठी प्रशासकीय कामकाजाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात असून यामधील ज्ञानाचा उपयोग दैनंदिन कामकाजात करावा आणि कामाला गती द्यावी अशा शब्दात अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी मनोगत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत वन प्रशिक्षण संस्था, शहापूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य विभागातील परिचारिका संवर्गासाठी आयोजित प्रशासकिय प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वन प्रशिक्षण संस्था शहापूर येथील रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री. शर्मा, सहाय्यक अधिकारी श्री. उमेश गावकर आणि प्रशिक्षक व्याख्याते श्री. प्रकाश मोहिते, डॉ. अशोक सावंत व श्री. एस.जी.पारधी उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये 4 सत्रात 'ताणतणाव व्यवस्थापन, संवाद कौशल्य, सरकारी कर्मचारी यांचे व्यक्तिमत्व', महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा 2013 व विशाखा समिती या विषयांवर 2 सत्रे घेण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 बाबत 2 सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
Published on : 30-09-2021 08:30:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update