*एल ॲण्ड टी इन्फोटेक व इतर संस्था, उद्योगांकडून सीएसआर अंतर्गत व्हेन्टिलेटर्स प्राप्त*
कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्याकरिता आरोग्य सुविधांमध्ये आवश्यक वाढ करीत असताना दुस-या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार आयसीयू बेड्स व व्हेन्टिलेटर्स उपलब्धतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यामध्ये काही स्वयंसेवी संस्था व उद्योग समुह यांच्यामार्फतही सीएसआर निधी अंतर्गत मदतीचा हात पुढे केला जात आहे.
या अनुषंगाने एल ॲण्ड टी इन्फोटेक इंडिया लि. या उद्योग समुहाच्या सीएसआर निधीतून 10 व्हेन्टिलेटर्स महानगरपालिकेस प्रदान करण्यात आले. सुजया फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयातून महानगरपालिकेस प्राप्त झालेले हे व्हेन्टिलेटर्स अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. याप्रसंगी एल ॲण्ड टी इन्फोटेकचे मुख्य लेखा अधिकारी श्री. अनिल टंडेर, सीएसआर उपाध्यक्ष बी .एस. सलुजा, कॉर्पोरेट सेवा प्रमुख नेहा खरे, सुजया फाउंडेशनच्या कार्यक्रम संचालक सुजया शेट्टी व विश्वस्त हुजान मिस्त्री आणि रोटरी क्लबचे प्रमुख हर्ष मोकल व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी 1 रुग्णवाहिका देखील एल ॲण्ड टी इन्फोटेक इंडिया लि. यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अशाच प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेस एल ॲण्ड टी सीवू़ड्स लि. यांच्याकडून 2 व्हेन्टिलेटर्स, आयकीया इंडिया प्रा.लि. यांच्याकडून 2 व्हेन्टिलेटर्स, आयनॉक्स गॅस यांच्याकडून 2 व्हेन्टिलेटर्स, हिंदुस्थान प्लॅटिनम यांच्याकडून 2 व्हेन्टिलेटर्स तसेच टोटल ऑईल प्रा.लि, ग्रीन स्पेस, गंगा डेव्हलपर्स, नोव्हा रियालिटीज यांच्याकडून प्रत्येकी 1 व्हेन्टिलेटर्स सीएसआर निधीतून प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे रिलायन्स फाऊंडेशन यांनीही 10 व्हेन्टिलेटर्स सीएसआर अंतर्गत दिलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेचे सक्षमीकरण केले जात असताना विविध संस्था, उद्योग समुह यांनी सीएसआर निधी अंतर्गत व्हेन्टिलेटर्सच्या स्वरूपात पुढे केलेला मदतीचा हात लोकोपयोगी आहे.
Published on : 30-09-2021 14:16:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update