*कंत्राटी कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी 28 ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश *
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदास दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान तसेच ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करणेबाबत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख यांस निर्देश दिले आहेत.
त्यासोबतच महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत कंत्राटी कामगार तसेच ठेकेदाराकडील कर्मचारी यांचीही दिवाळी आनंदात जावी यादृष्टीने आयुक्तांनी सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता विहित मुदतीत बोनस व रजा रोखीकरण रक्कम तसेच ऑक्टोबर महिन्याचे मासिक वेतन 28 ऑक्टोबरपूर्वी अदा करणेबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
सदर आदेशान्वये सर्व कंत्राटी कामगार व ठेकेदाराकडील कर्मचा-यांना 2 नोव्हेंबर पासून सुरू होणा-या दिवाळीआधीच बोनस व रजा रोखीकरण रक्कम तसेच ऑक्टोबर महिन्याचे मासिक वेतन मिळणार असल्याने त्यांच्यामार्फत आनंद व्यक्त केला जात आहे.
Published on : 26-10-2021 11:18:25,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update