तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागांतर्गत रुम नं.A-1/89/8, से.21, तुर्भे येथे नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता तळ +3 मजल्याचे लोड बेअरिंगचे वीट बांधकाम सुरु होते. तसेच मालमत्ताधारक, घर क्र. 1598/07 व साईबाबा मंदिरा जवळ कोपरीगांव, याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता आर.सी.सी. प्लींथचे बांधकाम सुरु होते.
या दोन्ही अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेल्याहोत्या. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु होते. या अनधिकृत बांधकामावर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमे अंतर्गत अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेले असुन या मोहिमेसाठी तुर्भे विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/ अंमलदार तैनात होते.
या मोहिमेकरीता 10 मजुर, 01 जे.सी.बी., यांचा वापर करण्यात आलेला आहे.
तसेचयापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येईल.
Published on : 29-10-2021 15:18:42,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update