तुर्भे व घणसोली विभागात अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागाअंतर्गत शॉप नं. 3, भु.क्र. 19, 20, से.19 डी, तुर्भे, येथे शॉप व बेसमेंट मधील स्लॅब कट करुन पाय-यांचे बांधकाम केले असुन शॉपमध्ये विट बांधकामाचे काम सुरु आहे. तसेच भु.क्र. 44/9, चावला हाऊस, से. 18, तुर्भे येथे महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता पहिल्या व दुस-या मजल्यावर अंतर्गत बदल करुन विट बांधकामाच्या सहाय्याने रुम बनवल्या आहेत. तसेच मंजुर नकाशातील ओपन टेरेस बंदिस्त करुन रुम बनवल्या आहेत.
या दोन्ही अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच होते. त्यानुसार अनधिकृत बांधकामावर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करुन दोन्ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या मोहिमेसाठी तुर्भे विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार देखील तैनात ठेवण्यात आलेले होते.
या मोहिमेकरीता 14 मजुर, 01 गॅस कटर, 01 इलेक्ट्रीक हॅमर यांचा वापर करण्यात आलेला आहे. सदर अनधिकृत बांधकाम निष्कासन कारवाई पोटी रक्कम रु.1,00,000/- इतकी दंडात्मक वसुली देखील करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे घणसोली कार्यक्षेत्रातील गवळी हॉस्पिटल समोर, रबाळे या ठिकाणी पहिल्या मजल्याचे आरसीसी बांधकाम पूर्ण असलेले बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामास घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
या अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार सदरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-10, ब्रेकर-2, गॅस कटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
या पूढे देखील अशा प्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.
Published on : 15-12-2021 13:53:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update