वाशी विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वाशी विभागांतर्गत भुखंड क्र-१बी, सेक्टर -१०, वाशी येथे पहिल्या मजल्यावर नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनाधिकृतपणे सामासिक जागेत वाढीव बांधकाम सुरू केले होते. अनाधिकृत बांधकामास वाशी विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु त्यांनी सदर ठिकाणी अनाधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
सदर अनाधिकृत बांधकामावर वाशी विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून करण्यात आलेले अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी वाशी विभागाकडील अधिकारी / कर्मचारी, १० मजूर, १ गॅस कटर, २ हॅमर, ४ घन /हातोडे याच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले.
या पुढे देखील अशाप्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 27-12-2021 13:54:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update