ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामावर व वाशी विभागातील अनधिकृत झोपड्यांवर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सेक्टर 07, ऐरोली येथील रो-हाऊस क्र. 02, 03 व 06, भुखंड क्र. 30, राकेश पार्क सोसायटी येथे अनधिकृतपणे तळमजल्यावरील पार्किंगच्या जागेत नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता गाळयाचे बांधकाम केले होते. या अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 53(1) अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवेले होते.
या अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत गाळयाचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 01 जेसीबी, 02 मजूर, 01 गॅसकटर व जी विभाग ऐरोली येथील अधिकारी/कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वाशी विभागांतर्गत केरळा भवन ते वाशी हायवे पर्यंत, वाशी येथील उद्यानाकरीता आरक्षित असलेल्या मोकळ्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या झोपड्यांवर वाशी विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून 176 अनाधिकृत झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. या धडक मोहिमेसाठी वाशी विभागाकडील अधिकारी / कर्मचारी, 23 मजूर, 1 जेसीबी यांच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले.
तसेच वाशी कार्यक्षेत्रातील फेरीवाले व मार्जिनल स्पेसवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये 2 हातगाडी, टेबल, बाकडे, आईसक्रिम गाडी, नाशवंत भाजीपाला, फळे, फुले तसेच मार्जिनलमध्ये लावण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले साहित्य कोपरखैरणे क्षेपणभुमी येथे जमा करण्यात आले.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 10-01-2022 14:28:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update