*'हर घर दस्तक' आणि 'लसीकरण आपल्या दारी' मोहीमेअंतर्गत 55 हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण*
कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमबलबजावणी करण्याकडे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषत्वाने लक्ष दिले जात असतानाच कोव्हीड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊ कोव्हीड विषाणूचा प्रभाव आहे तिथेच रोखण्यासाठी टारगेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे. दररोज 11 हजारपर्यंत कोव्हीड टेस्ट्स केल्या जात आहेत तसेच कोव्हीड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणा-यांचे प्रमाणही लवकरात लवकर 100 टक्के करण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांचा उपयोग करुन लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे.
शासनाने राबविलेल्या कोव्हीडविषयक विविध उपक्रमांत नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच उत्तम कामगिरी केली असून यामध्ये एक महत्वाचा उपक्रम म्हणजे 'हर घर दस्तक मोहीम'. या मोहीमेंतर्गत घराच्या उंब-यापर्यंत पोहचून 11 नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत 55 हजार 296 व्यक्तींचे घराजवळच लसीकरण करण्यात आले आहे. या मोहीमेची 859 सत्रे राबविण्यात आली असून 18 वर्षावरील 18481 नागरिकांना पहिला डोस तसेच 36780 नागरिकांना दुसरा डोस आणि 35 नागरिकांना प्रिकॉशन डोस अशाप्रकारे 55296 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
या उपक्रमाप्रमाणेच 'लसीकरण आपल्या दारी' या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मार्केट, रेल्वे स्टेशन्स्, बस डेपो अशा मोक्याच्या ठिकाणी रुग्णवाहिका अथवा रुग्णवाहिकेत रुपांतरित केलेल्या बसेस उभ्या करुन त्या ठिकाणीही लसीकरण करण्यास 20 डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत 623 ठिकाणी 13204 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
याशिवाय 5 रेल्वे स्टेशनवरही कोव्हीड टेस्टींग केंद्रांप्रमाणेच कोव्हीड लसीकरण केंद्रेही कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. 11 नोव्हेंबरपासून वाशी व नेरुळ, 12 नोव्हेंबरपासून घणसोली तसेच 30 नोव्हेंबरपासून ऐरोली आणि 2 डिसेंबरपासून कोपरखैरणे रेल्वे स्टेशनवर लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या 5 रेल्वे स्टेशन्सवरील 208 लसीकरण सत्रात 17831 नागरिकांनी कोव्हीड लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे.
15 ते 18 वयोगटातील कुमारवयीन मुलांच्या लसीकरणामध्येही 65498 मुलांचे लसीकरण करून 89.26 टक्के इतके उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. पुढील तीन ते चार दिवसात 100 टक्के उदिदष्ट साध्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
10 जानेवारीपासून सुरु झालेल्या आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे व कोमॉर्बिडिटी असणारे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांच्याही प्रिकॉशन डोस मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत 2374 आरोग्यकर्मीनी, 2745 पहिल्या फळीतील कोरोना योध्दयांनी तसेच 1419 कोमॉर्बिडिटी असणा-या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी अशा प्रकारे 5 दिवसात 6538 लाभार्थ्यांनी तिसरा म्हणजेच प्रिकॉशन डोस घेतला आहे.
कोव्हीड लस अत्यंत सुरक्षित असून ती घेतल्यानंतरही जर कोरोनाची लागण झाली तरी त्याची तीव्रता मर्यादित राहते असे विशेषत्वाने निदर्शनास येत असून ज्या नागरिकांचा कोव्हीड लसीचा दुसरा डोस घ्यायचा राहिला असेल त्यांनी विहित कालावधीत तो लगेच घ्यावा तसेच आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे व कोमॉर्बिडिटी असणारे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांनीही दुसरा डोस घेऊन 9 महिने / 39 आठवडे झाल्यानंतर अधिक संरक्षण देणारा कोव्हीड लसीचा तिसरा डोस म्हणजे प्रिकॉशन डोस लगेच घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
Published on : 15-01-2022 11:50:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update