वाशी व कोपरखैरणे विभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वाशी विभाग अंतर्गत भुखंड क्र – 80, 81, वाशी प्लाझा, सेक्टर - 17, वाशी येथील शॉप नं- 126 व मे. मार्स कंस्ट्रक्शन ॲण्ड ट्रेडिंग कंपनी, शॉप नं- 127, सी विंग येथील तळ मजल्यावर नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे जनरेटर रूमच्या जागेत वाणिज्य स्वरूपाचा व्यवसाय करत असून पोटमाळ्याचे अनधिकृत बांधकाम केले होते. या अनधिकृत बांधकामास वाशी विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५3 (1) अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु संबंधितांकडून सदर ठिकाणचे अनाधिकृत बांधकाम काढण्यात आले नव्हते.
सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी वाशी विभागाकडील अधिकारी / कर्मचारी, 11 मजूर, 2 ब्रेकर, 1 गॅसकटर, 4 घन /हातोडे यांच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत पुष्पकुंज को ऑप हौ सोसायटी, प्लॉट नंबर 44/B, सेक्टर- 12B, कोपरखैरणे येथे नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे फ्लॅटमध्ये अंतर्गत बांधकाम केले होते. या अनधिकृत बांधकामास कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 53(1) अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती, परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम होते.
सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 06 मजूर, 01 गॅस कटर, 01 ब्रेकर, 1 पीकअप व्हॅन तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 18-01-2022 14:00:17,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update