*मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये नमुंमपा कर्मचा-यांनी केले अभिजात साहित्यकृतींमधील वेचक भागाचे अभिवाचन*

शहरी पर्यावरणाला नवा आयाम देणा-या महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्यामार्फत राबविल्या जाणा-या 'माझी वसुंधरा अभियाना'मध्ये मागील वर्षी 2021 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यात व्दितीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. यावर्षी सन 2022 मध्ये माझी वसुंधरा अभियानात सहभागी होताना 'निश्चय केला, नंबर पहिला' हे ध्येय नजरेसमोर ठेवून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे.
असाच *एक अभिनव उपक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने 'सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा' रूपाने राबविण्यात आला. दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना टंकलेखनाप्रमाणेच स्वहस्ताक्षरातही मजकूर लिहावा लागतो. त्यामध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी यांचे हस्ताक्षर चांगले असल्याचे दिसून येते. अशा सुंदर हस्ताक्षर असणा-या कर्मचारीवृंदाच्या हस्ताक्षराची प्रशंसा व्हावी तसेच इतर कर्मचा-यांमध्येही तशा प्रकारची भावना निर्माण व्हावी यादृष्टीने माझी वसुंधरा अभियान अभियानाची शपथ अधिकारी, कर्मचारीवृंदाने आपल्या हस्ताक्षरात लिहून द्यावी, त्याचे त्रयस्थ मान्यवराकडून परीक्षण व्हावे व त्यामधील सर्वोत्तम हस्ताक्षर असणा-या कर्मचा-यांना पारितोषिक देऊन प्रोत्साहित करावे अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.*
माझी वसुंधरा अभियानाच्या नमुंमपा नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाची शपथ स्वहस्ताक्षरात लिहून देण्याचे अधिकारी, कर्मचारीवृंदास आवाहन करण्यात आले. या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद देत सुंदर हस्ताक्षर असणा-या 102 अधिकारी, कर्मचारी यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. श्रीम. अमृता आमोदकर यांनी प्राथमिक परीक्षण केले. *नामांकीत सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी या स्पर्धेचे अंतिम परीक्षण करीत अशाप्रकारे संगणकाच्या जमान्यात हस्ताक्षर लेखनाला प्रोत्साहीत करणा-या आयुक्तांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे कौतुक केले.*
माझी वसुंधरा अभियानाच्या शपथचे सुंदर हस्ताक्षर लेखन करणा-या अधिकारी, कर्मचारीवृंदास प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, विधी अधिकारी श्री. अभय जाधव यांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
*सुलेखन कलेच्या माध्यमाव्दारे शपथेचे सुंदर हस्ताक्षर लेखन करणा-या 4 कर्मचा-यांचा स्पर्धेसाठी स्वतंत्र विचार करण्यात आला. त्यामधून शिक्षण विभागातील शिक्षक श्री. प्रशांत गाडेकर यांना सर्वोत्तम हस्ताक्षर सुलेखनाचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.*
*त्याचप्रमाणे नियमित लेखन स्वरूपात सुंदर स्वहस्ताक्षरात शपथ लेखन करणा-या 98 महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यामधून श्री. जिज्ञेश देवरूखकर (समाजविकास विभाग) प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. श्री.पांडुरंग काठवले (गौरव म्हात्रे कलाकेंद्र, सीबीडी बेलापूर), श्री.निलेश पवार (घनकचरा व्यवस्थापन विभाग, ऐरोली) हे अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमाकांचे पारितोषिक विजेते ठरले. उत्तेजनार्थ पारितोषिकांनी श्री.लवेश पाटील (वाशी विभाग कार्यालय), श्रीम.चारूशीला शिंदे (स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष), श्री. विजय आंब्राळे (सचिव विभाग), श्रीम. वर्षा कुंभार (माहिती व जनसंपर्क विभाग), श्री.लक्ष्मण जाधव (विधी विभाग), श्रीम. स्वाती अमृते (लेखा विभाग), श्री. नितीन म्हात्रे (ऐरोली विभाग कार्यालय) या 7 कर्मचा-यांस सन्मानीत करण्यात आले.* याप्रसंगी माझी वसुंधरा अभियानाची शपथ सामुहिकरित्या ग्रहण करण्यात आली.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित विविध उपक्रमांतील हा माझी वसुंधरा अभियान शपथेचा सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचा उपक्रम विशेषत्वाने आगळावेगळा होता, ज्या माध्यमातून सुबक मराठी हस्ताक्षर लेखनाचा तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रसारित झाला.
Published on : 31-01-2022 10:22:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update