ऐरोली विभागात बाईकर्सनी केला स्वच्छता संदेशाचा व्यापक प्रचार

स्वच्छ सर्वेक्षणातील नवी मुंबईच्या आजवरच्या मानांकनात नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा मोलाचा वाटा राहिला असून 'स्वच्छ सर्वेक्षण २०२२' मध्ये महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मागदर्शनाखाली नागरिकांच्या सर्वेक्षणातील सहभाग वाढीवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून भर देण्यात येत आहे .
अशाच प्रकारचा स्वच्छताविषयक एक अभिनव जनजागृतीपर उपक्रम ऐरोली जी विभाग कार्यालयाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. महेंद्र सप्रे यांच्या माध्यमातून 'स्वच्छता जनजागृती बाईक रॅली'च्या रूपाने राबविण्यात आला. यामध्ये १२५ बाईकर्सनी उत्साहाने सहभागी होत संपूर्ण ऐरोली विभाग कार्यालय क्षेत्रात स्वच्छतेचा जागर केला .
यादवनगर, ऐरोली परिसरातील देवीधामनगर येथून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या शुभहस्ते झेंडा दाखवून बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब राजळे यांनी स्वतः बाईक चालवित रॅलीत शेवटपर्यंत सहभाग घेतला .
याप्रसंगी रॅलीचे आयोजक ऐरोली विभागाचे सहा आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. महेंद्र सप्रे, मुख्य स्वच्छाता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री विनायक जुईकर, ऐरोलीचे स्वच्छता अधिकारी श्री. सुभाष म्हसे, क्रुझर्स कॅन्व्हाय क्लबचे प्रमुख श्री.भरत चौधरी, स्वच्छता निरीक्षक श्री. विचारे व श्री. महाले, अधिक्षक श्री. दिलीप वाघमारे, श्री. संतोष पाटील व श्रीम. सुमन कांबळे, वरिष्ठ लिपिक श्री. महेश नाईक उपस्थित होते.
एमआयडीसी भागातील देवीधामनगर येथून स्वच्छ सर्वेक्षण २०२२ बाईक रॅलीची सुरुवात होऊन चिंचपाडा आतील भाग ते भारत बिजली जंक्शन ते नमुंमपा अग्निशमन दल ते सेंट झेव्हियर्स स्कुल ते गणपतीबाप्पा चौक ते डी मार्ट ते डि.ए. व्ही. स्कुल ते हेगडे भवन ते गणेश इच्छापूर्ती मंदीर ते सेक्टर १९ स्मशानभूमी ते सेक्टर २० सी ते हॉटेल कार्निवल ते नानासाहेब धर्माधिकारी चौक ते शिवकॉलनी ते ऐरोली नाका ते ऐरोली बस डेपो ते ऐरोली जी विभाग कार्यालय येथे बाईक रॅलीची यशस्वी सांगता झाली. त्याठिकाणी सहभागी बाईकर्सना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली.
बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी क्रुझर्स कॅन्व्हाय क्लबचे प्रमुख श्री. भरत चौधरी यांचेसह सर्वश्री. श्रीधर चिदुमाला, आसाद सय्यद, उमेश देवकर या पदाधिकार्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. या बाईकर्ससह नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदानेही बाईक रॅलीत उत्साहाने सहभागी होत हा जनजागृतीपर उपक्रम यशस्वी केला.
Published on : 20-03-2022 13:32:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update