*जागतिक क्षयरोग दिनी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन*
24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅली वाशीतील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून गावदेवी मंदिर जूहुगाव मार्गे आयसीएल महाविदयालयापर्यंत क्षयरोग विषयी जनजागृती करीत आयोजित करण्यात आली. यामध्ये शहर क्षयरोग अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, वाशी विभागाचे सहा. आयुक्त श्री. सुखदेव येडवे, वैदयकिय अधिकारी डॉ. निनाद काकडे, डॉ. प्रदिप परदेशी, डॉ. विदया वर्मा, डॉ. मनेका पाटील, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच आयसीएल महाविदयालय वाशीचे प्राचार्य, प्राध्यापक व विदयार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी जाले होते. क्षयरोगमुक्त भारत देश अशी शपथ घेऊन रॅलीचा प्रारंभ करण्यात आला तसेच प्रेरणादायी गाण्याचे सादीकरण करण्यात आले. रॅलीची सांगता आयसीएल महाविदयालयात प्राचार्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. रॅलीमध्ये क्षयरोग विषयक घोषणा देत जनसामान्यांमध्ये क्षयरोग विषयक जनजागृती करण्यात आली.
क्षयरोगासंदर्भात लक्ष वेधून घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी क्षयरोग निर्मुलन संदर्भात घोषवाक्य प्रसारित करीत असते. Invest to End TB. Saves Lives – टीबी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा असे या वर्षीचे घोषवाक्य असून त्यानुसार आरोग्य विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 24 मार्च ते 13 एप्रिल 2022 या 21 दिवसांच्या कालावधीत “क्षयरोग मुक्त भारत अभियान” राबविण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत मागील 5 वर्षाच्या कालावधीतील क्षयरुग्णांची, कोव्हीड-19 चा इतिहास असलेल्या तसेच मधुमेह, एच.आय.व्ही, कुपोषित अथवा तंबाखूचे सेवन करण्याऱ्या व्यक्तींची क्षयरोगाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येणार आहे. तरी सदर अभियानांतर्गत तपासणीकरिता येणाऱ्या नमुंमपा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 28-03-2022 06:48:34,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update