महाराष्ट्र दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांचा सन्मान
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले व श्री.संजय काकडे तसेच विभागप्रमुख, अधिकारी -कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कामगार दिनाचे औचित्य साधून उत्तम काम करणा-या उद्यान व पाणीपुरवठा विभागात कार्यरत प्रत्येक विभागामधील एका कामगारास प्रातिनिधीक स्वरूपात आयुक्त महोदय यांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले. उद्यान विभागातील कामगारांमध्ये श्रीम.लक्ष्मीबाई परशुराम कोळी (बेलापूर), श्रीम. कमला सुभाष काळबोडे (नेरूळ), श्रीम.सुमन खंदारे (वाशी), श्रीम.व्दारकाबाई वसंत भगत (तुर्भे), श्रीम. जानकी प्रल्हाद वानखडे (कोपरखैरणे), श्रीम. मंजुळा मुठे (घणसोली), श्रीम.झुंबरबाई मारूती शेंगाळ (ऐरोली) या उद्यानातील महिला कामगारांचा तसेच पाणीपुरवठा विभागातील श्री.सरोज पासवान (बेलापूर), श्री.सदानंद काकडे (नेरूळ), श्री.किसन दिवाकर (वाशी), श्री. रोहित कश्यप (तुर्भे), श्री.दिपक पवार (कोपरखैरणे), श्री.बंदगी लोगावी (घणसोली), श्री.कैलास कांबळे (ऐरोली), श्री.मच्छिंद्र पाटील (दिघा), श्री.विजय ठाकून मुख्य जलवाहिनी), श्री.मकरंद कुलकर्णी (स्काडा प्रणाली) या जलवितरणामध्ये उत्तम कामगिरी करणा-या 17 महिला व पुरूष कामगारांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीस 30 एप्रिल ते 2 मे 2022 या कालावधीत विद्युत रोषणाई करण्यात आली असून हुतात्मा चौकाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. ती बघण्यासाठीही नागरिक या परिसराला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
Published on : 01-05-2022 05:36:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update