शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणमंत्र्यांनी केले महापालिका विद्यार्थ्यांचे स्वागत
शासन निर्णयानुसार (जा.क्र.संकीर्ण-2022/प्र.क्र.58/एसडी4, दिनांक 11/04/2022) तसेच मा.शालेय शिक्षण मंत्री यांचे मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणणेकरिता दिनांक 15/06/2022 पासुन कोविड नियमांचे पालन करुन शाळा सुरु करणेत आलेल्या आहेत.
शाळा पूर्वतयारीचा आज दुसरा मेळावा शाळेत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी शाळेत आलेल्या विदयार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे कोविड स्थितीबाबत प्रबोधन करण्यात आले. विदयार्थ्यांना मास्क लावून शाळेत येणेबाबत सूचना देण्यात आल्या. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये 90 टक्केच्या वर उपस्थिती आढळून आली. काही शाळांमध्ये लोकप्रतिनिधीही मुलांच्या स्वागतासाठी तसेच मुलांनी लावलेल्या स्टॉल्सचे कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
आजच्या दिवसाचे खास वैशिष्टय म्हणजे स्वत: शालेय शिक्षणमंत्री ना. श्रीम.वर्षाताई गायकवाड यांनी नमुंमपा शाळा क्रमांक 42, घणसोली येथे भेट दिली. उपस्थित सर्व विदयार्थ्यांचे मा.शिक्षण मंत्री यांनी स्वागत केले. स्वत: शिक्षण मंत्र्यांनी स्वागत केल्यामुळे मुलांना अतिशय आनंद झाला. विदयार्थ्यांशी मंत्री महादेयांनी संवाद साधला. शिक्षकांनी लावलेल्या विविध सहा प्रकारच्या स्टॉलचे निरीक्षण केले. विदयार्थ्यांनीही मंत्री महोदयांशी छान प्रकारे संवाद साधला. मा.शिक्षण मत्र्यांनी विदयार्थ्यांचे कौतुक केले. पालकांशीही सुसंवाद साधला. दुसरीपासून वरच्या प्रत्येक वर्गात जाऊन विदयार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाविषयी विचारणा केली. मनपा शाळेच्या विदयार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. तसेच इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती यादीतील गुणवत्ताधारक विदयार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मा.शालेय शिक्षण मंत्री यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विदयार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांना शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (2) श्री. संजय काकडे, उप आयुक्त (शिक्षण,) श्री जयदीप पवार,शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव, प्र.विस्तार अधिकारी श्रीम सुलभा बारघरे आणि शाळा क्र.42 चे मुख्याध्यापक श्री. खुशाल चौधरी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
नमुंमपा शाळेसोबतच मा.शालेय शिक्षण मंत्री यांनी घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कुल या खाजगी शाळेलाही भेट दिली. शाळेने त्यांचे यथोचित स्वागत केले. सदर शाळेतही मा.शालेय शिक्षण मंत्री यांनी विदयार्थ्यांचे स्वागत केले व सुसंवाद साधला. विदयार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षकांशी संवाद साधला.
आज शाळेच्या पहिल्या दिवशी नमुंमपा सर्व शाळांमध्ये सर्व इयत्तांच्या विदयार्थ्यांना (बालवाडी ते दहावी) पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विदयार्थ्यांचा पहिला दिवस साजरा करणेकरिता त्यांना गोड भोजनाची मेजवानी देण्यात आली.
सद्यस्थितीत कोविड साथरोगाच्या चौथ्या लाटेच्या उंबरठयावर राज्य असूनही शाळांमधील विदयार्थ्यांची उपस्थिती व उत्साह वाखाणण्याजोगा होता हे आजच्या पहिल्या दिवसाचे वैशिष्टय आहे.
Published on : 15-06-2022 15:47:51,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update