*दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देणेकरिता अंतिम प्रतिक्षा यादीबाबत सूचना*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता “प्रतिक्षा यादी” तयार करणेकामी दि. 11 फेब्रुवारी 2019 आणि दि. 06 जून 2019 रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करून दिव्यांग लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आलेले होते.
त्यास अनुसरून एकूण 714 अर्ज महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. सदर अर्जदारांची अंतिम प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली असून ही यादी अंतिम करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांकडून दि. 06 ऑगस्ट पासून दि.12 ऑगस्ट 2022 पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत.
1) जे अर्जदार शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, सिडको, एम.आय.डी.सी., इत्यादी सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये नियमित / करार / ठोक पगारावर सेवेत असतील अथवा, ज्यांनी वरील प्राधिकरणांकडून यापूर्वी व्यावसायिक जागा उपलब्ध करून लाभ घेतलेला असेल. अथवा, ज्या अर्जदारांना अन्य कुठलेही उत्पन्नाचे स्त्रोत असेल तसेच त्यांच्या दिव्यांगाबाबत काही आक्षेप / सूचना असल्यास याबाबत हरकती / सूचना नोंदवितांना त्याला पूरक अशी प्रमाणित केलेली विहित कागदपत्रे हरकती / सूचनेसोबत सादर करणे आवश्यक राहील.
2) अर्जदारांची प्रतिक्षा यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तसेच मालमत्ता विभाग, नमुंमपा मुख्यालय त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेची 08 विभाग कार्यालये याठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
3) अर्जदारांनी आपल्या हरकती / सूचना लेखी स्वरूपात उपआयुक्त (मालमत्ता विभाग), तळ मजला, मालमत्ता विभाग, नमुंमपा मुख्यालय, भूखंड क्र. 01, सेक्टर -15A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - 400614 यांच्याकडे दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सायं 5.00 वाजेपर्यंत पोहचतील अशाप्रकारे सादर करावयाच्या आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष अथवा पोस्टाव्दारे / कुरिअरव्दारे प्राप्त होणा-या हरकती सूचना ग्राह्य धरल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिका मालमत्ता विभागाच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
Published on : 05-08-2022 14:55:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update