*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नमुंमपा शाळांतील विद्यार्थ्यांनी शब्दबध्द केला स्वप्नातील भारत*
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध घटकांना सहभागी करून घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध विभागांमार्फत मोठ्या प्रमाणावर वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये देशाचे भविष्य असणा-या मुलांच्या मनातील देशाविषयीची संकल्पना मांडण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने “माझ्या स्वप्नातील भारत” या विषयावर वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात 70 मुलांनी निबंध स्पर्धेत सहभागी घेत आपल्या स्वप्नातील भारताचे चित्र शब्दांकित केले. यामध्ये पहिली ते पाचवीच्या गटात 4, सहावी ते आठवीच्या गटात 44 तसेच नववी ते दहावीच्या गटात 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेतून 1 उत्तम लिखाण करणा-या विद्यार्थ्याची निवड करून त्याला या आंतरशालेय निबंध स्पर्धेसाठी शाळेकडून पाठविण्यात आलेले होते.
अत्यंत उत्साहाने संपन्न झालेल्या या आंतरशालेय निबंध स्पर्धेत सहभागी होत विद्यार्थ्यांनी स्वप्नातल्या भारताचे शब्दचित्र रेखाटले.
Published on : 22-08-2022 14:17:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update