*ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई*
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली विभागांतर्गत सेक्टर 03 ऐरोली येथील घर क्रमांक 370 ऐरोली गांव येथे कॉलमचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु होते. या अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु, सदर ठिकाणी संबंधितांनी अनधिकृत बांधकाम सुरुच ठेवले होते.
या अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमे अंतर्गत हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले असून या मोहिमेसाठी ऐरोली विभागातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी / अंमलदार तैनात होते.
त्याचप्रमाणे या मोहिमेकरीता 13 मजूर, 01 पोकलेन, 02 गॅस कटर, 06 इलेक्ट्रीक हॅमर यांचा वापर करण्यात आलेला आहे.
तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येईल.
Published on : 06-09-2022 14:57:00,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update