*”गणपत्ती बाप्पा मोरया”च्या गजरात सातव्या विसर्जनदिनी 2937 श्रीमूर्तींना भक्तीमय निरोप*
श्रीगणेशोत्सवातील विसर्जनाच्या सातव्या दिवशी महानगरपालिकेने सर्व विभागांमध्ये निर्माण केलेल्या केलेल्या कृत्रिम तलावांना पसंती देत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2789 घरगुती व 148 सार्वजनिक अशा एकूण 2937 श्रीमूर्तींचे विसर्जन सुव्यवस्थितरित्या संपन्न झाले. यामध्ये 22 पारंपारिक मुख्य विसर्जनस्थळांवर 1604 श्रीगणेशमूर्तींचे व 134 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1333 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यामध्ये, मुख्य 22 विसर्जन स्थळांमधील -
बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 226 घरगुती व 08 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 361 घरगुती व 43 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 122 घरगुती व 08 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 239 घरगुती व 23 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात 2 विसर्जनस्थळांवर 126 घरगुती, 25 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 237 घरगुती व 20 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 87 घरगुती व 05 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
दिघा विभागात 1 विसर्जन स्थळावर 66 घरगुती व 08 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
अशाप्रकारे एकूण 22 विसर्जन स्थळांवर श्रीगणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी 1464 घरगुती व 140 सार्वजनिक अशा एकूण 1604 श्री गणेश मुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
त्याचप्रमाणे बेलापूर ते दिघा अशा आठही विभागातील एकूण 134 कृत्रिम विसर्जन स्थळांवर,
बेलापूर विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 19 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
नेरूळ विभागात – 24 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 47 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 35 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 170 घरगुती व 08 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 306 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात - 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 438 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 188 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
दिघा विभागात – 9 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 122 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
अशाप्रकारे एकूण 134 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 1325 घरगुती व 08 सार्वजनिक अशा एकूण 1333 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले.
सर्व विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांचेसह स्वयंसेवकांची तसेच मुख्य विसर्जन स्थळांवर लाईफ गार्ड्सची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यासोबतीने अग्निशमन विभाग आणि आरोग्य विभागाचेही पथक कार्यरत होते. सर्व विसर्जन ठिकाणी नवी मुंबई पोलीसांची दक्षतेने नजर होती.
यापुढील शुक्रवार दि 09 सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशीदिनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आकाराने मोठ्या श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन होणार असल्याने तसेच यादिवशी सर्वाधिक संख्येने श्रीमुर्ती विसर्जनाची परंपरा लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा अधिक दक्षतेने कार्यरत असणार आहे. तरी भाविकांनी आत्तापर्यंत ज्या पध्दतीने विसर्जनाकरिता सहकार्य केले आहे अशाचप्रकारे सहकार्य करून बाप्पाचा विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 07-09-2022 13:27:31,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update