नेरुळ विभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागांतर्गत घर क्र. 800/002, नेरुळ गाव, से-20, नेरुळ, नवी मुंबई यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामास बी विभाग कार्यालय, नेरुळ यांचेमार्फत महाराष्ट्र नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर नेरुळ विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी नेरुळ विभागाकडील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सुनिल पाटील, अधिक्षक / वसुली अधिकारी श्री बाबा कराडे व संतोष शिलाम व कनिष्ठ अभियंता (अतिक्रमण) श्री रितेश पुरव, श्री रोहित ठाकरे, श्री अभय गावीत उपस्थित होते. तसेच 40 मजूर, 02 पीकअप व्हॅन, 15 हातोडे, 02 ब्रेकर व 01 गॅसकटर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 14-09-2022 14:24:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update