सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल परिसरात नो पार्कीगझोनमधील 122 वाहनांवर दंडात्मक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका ए विभाग कार्यालय बेलापूर यांच्या वतीने विभाग कार्यालय क्षेत्रातील सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल परिसरातील सेक्टर 40 व सेक्टर 42, नेरूळ येथे एनआरआय सागरी पोलीस ठाणे व नवी मुंबई वाहतूक पोलीस यांच्या सहयोगाने संयुक्त मोहीम राबवित नो पार्किंग झोन मध्ये उभ्या असलेल्या व रस्ते / पदपथावर अडथळा निर्माण करीत असलेल्या 122 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती, एनआरआय सागरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रविंद्र पाटील तसेच श्री पृथ्वीराज घोरपडे व गायमुख वाहतूक पोलीस ठाणे मधील सहा.पोलीस निरीक्षक श्री भिंगारदिवे यांच्या उपस्थितीत, बेलापूर विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. यापुढील कालावधीतही वाहतुक शिस्त आणि नियंत्रणाच्या दृष्टीने अशा प्रकारची कारवाई राबविण्यात येणार आहे.
Published on : 19-09-2022 12:09:04,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update