*कोपरखैरणे विभागातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई*
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागांतर्गत घर क्र ५८७/२, बोनकोडे गाव, सेक्टर-१२E, कोपरखैरणे घर क्र 595, बोनकोडे गाव, सेक्टर-12, कोपरखैरणे, नवी मुंबई यांना त्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम चालू होते.
या अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, तसेच न.मुं.म.पा पोलीस पथक, ९ मजूर, 01 गॅस कटर, 05 ब्रेकर, 1 पिकअप चा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकाम खर्च वसूली रु २५,०००/- जमा करण्यात आला.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 27-09-2022 14:53:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update