*भारतीय संविधान विषयक निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या गुणवंतांचा गौरव*
प्रत्येक भारतीय नागरिकाला आपलेसे वाटणारे संविधान आपल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देते. संविधानाविषयी आपण शाळेत असल्यापासून माहिती घेत असतो. एक जबाबदार नागरिक म्हणून संविधानातील मूल्यतत्वांविषयी जाणीवजागृती व्हावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेत 1700 हून अधिक नागरिक, विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभागी होत संविधानाविषयी आपला अभिमान व प्रेम भरभरून व्यक्त केले याबद्दल महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी स्पर्धेतील विजेत्यांसह सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ऐरोली सेक्टर 15 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, लेखक व वक्ते श्री. सुरेश सावंत, शिक्षणाधिकारी श्रीम. अरूणा यादव, ठाणे जिल्हा समाजकल्याण विभाग सहा. आयुक्त श्री. समाधान इंगळे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करून स्पर्धा विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
संविधान दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थी आणि नागरिक यांच्याकरिता आयोजित स्पर्धांकरिता (1) भारतीय संविधानाचे महत्त्व, (2) माझे संविधान, माझा अभिमान आणि (3) संविधान निर्मिती आणि बाबासाहेब – असे तीन विषय देण्यात आले होते.
यामध्ये निबंध स्पर्धेत नमुंमपा शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी 289 स्पर्धकांमधून शाळा क्र. 20 तुर्भेगांवची विद्यार्थिनी श्रावणी उंबरकर तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी 225 स्पर्धकांमधून शाळा क्र. 103 ऐरोलीची विद्यार्थिनी हर्षदा हारुगडे या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
खाजगी शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी 259 स्पर्धकांमधून श्रीराम विद्यालय ऐरोलीची विद्यार्थिनी अनुष्का भैय्ये तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी 316 स्पर्धकांमधून ज्ञानविकास विद्यालय कोपरखैरणेची विद्यार्थिनी प्रणाली जाधव या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
महाविद्यालयीन गटात सहभागी 7 स्पर्धकांमधून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशीची विद्यार्थिनी सायली कांबळे तसेच खुल्या गटात सहभागी 153 स्पर्धकांमधून विश्रांती चांगण या पहिल्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. प्रत्येक गटात प्रथम 3 क्रमांक आणि 2 उत्तेजनार्थ अशी 5 पारितोषिके प्रदान करण्यात आली.
वक्तृत्व स्पर्धेत नमुंमपा शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी 136 स्पर्धकांमधून शाळा क्र. 78 गौतमनगरची विद्यार्थिनी अंशीका यादव तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी 97 स्पर्धकांमधून शाळा क्र. 106 कोपरखैरणेची विद्यार्थिनी तनुजा पाटील या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
खाजगी शाळा स्तरावर प्राथमिक शालेय गटात सहभागी 133 स्पर्धकांमधून नवी मुंबई विद्यालय, वाशीची विद्यार्थिनी नितु सोलंकी तसेच माध्यमिक शालेय गटात सहभागी 118 स्पर्धकांमधून संजिवनी विद्यालय, दिघा चा विद्यार्थी अभिजीत डोळस हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. घोषवाक्य स्पर्धा अनेक स्पर्धकांच्या घोषवाक्य साम्यामुळे रद्द करण्यात आली.
शालेय स्तरावरील निबंध स्पर्धेचे परीक्षण करणारे परीक्षक श्री.काळुराम जाधव, श्री. संजय उबाळे, श्रीम. मनिषा जाधव, श्री. युवराज खंदारे, श्री. मधुकर वारभुवन, श्रीम. राजकुमारी इंदलकर तसेच खुल्या गटातील निबंध स्पर्धेचे परीक्षण करणारे परीक्षक श्री. रविंद्र पाटील यांना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या परीक्षक श्रीम. पुर्वा पाटोळे, श्रीम. गौरी इठणकर, श्रीम. मनिषा पाटणे यांचाही सन्मान करण्यात आला.
निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यातून 1733 इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक यांनी संविधानाचा बारकाईने विचार केला, अभ्यास केला व त्यावर आपली मते मांडली हे या स्पर्धेचे यश असून स्पर्धा आयोजनापाठीमागील उद्देश सफल झाल्याची भावना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली व सर्वांचे अभिनंदन केले.
(सोबत स्पर्धांचा संपूर्ण निकाल जोडलेला आहे.)
नवी मुंबई महानगरपालिका
संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धा
निबंध स्पर्धा
प्राथमिक शालेय गट (नमुंमपा स्तर)
प्रथम :- श्रावणी उंबरकर, नमुंमपा शाळा क्र.20, तुर्भेगाव
व्दितीय :- अक्षरा भासे, नमुंमपा शाळा क्र.39, हनुमाननगर, महापे
तृतीय :- जुई सकपाळ, नमुंमपा शाळा क्र.48, दिवा
उत्तेजनार्थ :- प्रियंका घुले, नमुंमपा शाळा क्र.91, दिवा
वेदांत शिंदे, नमुंमपा शाळा क्र.36, कोपरखैरणेगांव
प्राथमिक शालेय गट (खाजगी शाळा स्तर)
प्रथम :- अनुष्का भैय्ये, श्रीराम विद्यालय, ऐरोली
व्दितीय :- प्रणिती कळंत्रे, विद्याभवन प्राथमिक विद्यालय, नेरुळ
तृतीय :- वैष्णवी वने, ज्ञानविकास विद्यालय, कोपरखैरणे
उत्तेजनार्थ :- सृष्टी चिमणे, श्रीराम विद्यालय, ऐरोली
अपेक्षा लोहार, शिक्षण प्रसारक विद्यालय, नेरुळ
माध्यमिक शालेय गट (नमुंमपा स्तर)
प्रथम :- हर्षदा हारुगडे, नमुंमपा शाळा क्र.103, ऐरोली
व्दितीय :- स्नेहल भिसे, नमुंमपा शाळा क्र.111, तुर्भे स्टोअर
तृतीय :- प्रिन्स पवार, नमुंमपा शाळा क्र.105, घणसोली
उत्तेजनार्थ :- चैतन्य आव्हाड, नमुंमपा शाळा क्र.102, नेरुळ
सुजल कदम, नमुंमपा शाळा क्र.121, कुकशेत
माध्यमिक शालेय गट (खाजगी शाळा स्तर)
प्रथम :- प्रणाली जाधव, ज्ञानविकास विद्यालय, कौपरखैरणे
व्दितीय :- मेघा घुले, ऐरोली माध्यमिक विद्यालय, ऐरोली
तृतीय :- रिचा गवस, चार्टड इंग्लिश स्कुल, ऐरोली
उत्तेजनार्थ :- संस्कृती पवार, सुशीलादेवी देशमुख विद्यालय, ऐरोली
मोनाली वाघमारे, संजीवनी विद्यालय, दिघा
महाविद्यालयीन गट
प्रथम :- सायली कांबळे, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी
व्दितीय :- सिंचना कुलाल, एसआयईएस महाविद्यालय, नेरुळ
तृतीय :- लक्ष्मी पष्टे, एसआयईएस महाविद्यालय, नेरुळ
खुला गट
प्रथम :- विश्रांती चांगण, महापे
व्दितीय :- नारायण लांडगे, रबाळे
तृतीय :- कुमार बनसोडे, ऐरोली
उत्तेजनार्थ :- अमृता देवकर, बेलापूर
पूजा इंगळे, शिरवणे
नवी मुंबई महानगरपालिका
संविधान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा
प्राथमिक शालेय गट ( नमुंमपा स्तर)
प्रथम :- अंशिका यादव, नमुंमपा शाळा क्र. 78, गौतमनगर
व्दितीय :- ऋतुजा पाटील, नमुंमपा शाळा क्र. 35, कोपरखैरणे
तृतीय :- पियुष हिप्परकर, नमुंमपा शाळा क्र. 20, तुर्भेगांव
उत्तेजनार्थ :- अबोध बनसोडे, नमुंमपा शाळा क्र. 91, दिवा
स्नेहा सावंत, नमुंमपा शाळा क्र. 15, शिरवणे
प्राथमिक शालेय गट (खाजगी शाळा स्तर)
प्रथम :- नीतू सोलंकी, नवी मुंबई विद्यालय, वाशी
व्दितीय :-श्रुती पानसरे, विद्याभवन इंग्रजी हायस्कुल, नेरुळ
तृतीय :- मानसी साळुंखे, सरस्वती प्रा. विद्यालय, ऐरोली (इंग्रजी)
उत्तेजनार्थ :- ओंकार काळे, ज्ञानविकास प्रा. विद्यालय, कोपरखैरणे
सिद्धी गोरे, रा.फ. नाईक विद्यालय, कोपरखैरणे
माध्यमिक शालेय गट ( नमुंमपा स्तर)
प्रथम :- तनुजा पाटील, नमुंमपा शाळा क्र. 106, कौपरखैरणे
व्दितीय :- उत्कर्षा मुंगे, नमुंमपा शाळा क्र. 55, आंबेडकरनगर, कातकरीपाडा
तृतीय :- संपदा पांगारकर, नमुंमपा शाळा क्र. 103, ऐऱोली
उत्तेजनार्थ :- भैरवी देवकर, नमुंमपा शाळा क्र. 101, शिरवणे
अपेक्षा धोंगडे, नमुंमपा शाळा क्र. 112, करावे
माध्यमिक शालेय गट (खाजगी शाळा स्तर)
प्रथम :- अभिजीत डोळस, संजीवनी विद्यालय, दिघा
व्दितीय :- रिजा पटवेगार, विद्याभवन इंग्रजी हायस्कुल, नेरुळ
तृतीय :- ओंकार राठोड, शेतकरी शिक्षण संस्था, घणसोली
उत्तेजनार्थ :- लक्षिता वैष्णव, तेरणा विद्यालय, नेरुळ
विजेता हांडे, साई होलीफेथ स्कुल, कोपरखैरणे
Published on : 28-11-2022 10:28:29,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update