इज ऑफ लिव्हिंग इंड़ेक्समध्ये 7 जानेवारी पर्यंत नागरिक अभिप्राय नोंदवून नवी मुंबईला नंबर 1 बनविण्याचे आवाहन
स्वच्छतेत महाराष्ट्र राज्यात अग्रभागी आणि देशात तृतीय क्रमांकाने मानांकित नवी मुंबई शहर पाणीपुरवठा, रस्ते, दळणवळण, उद्याने, वाहतुक व्यवस्था, मलनिस्सारण व्यवस्थापन, शैक्षणिक व आरोग्य सुविधा तसेच अत्याधुनिक प्रकल्पांमुळे नागरिकांचे राहण्यायोग्य पसंतीप्राप्त शहर असून स्वच्छ सर्वेक्षणात 5 स्टार मानांकित शहर आहे.
या अनुषंगाने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित देशातील निवासयोग्य शहरांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ स्पर्धेमध्ये संपूर्ण क्षमतेने सहभागी झाले असून या स्पर्धा सर्वेक्षणाचा एक भाग असलेल्या ‘नागरिक अभिप्राय सर्वेक्षण (Citizen Perception Survey)’ मध्येही नागरिकांच्या उत्साही सहभागामुळे उच्च स्तर गाठताना दिसत आहे.
‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ अंतर्गत शहरातील स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतुक व्यवस्था अशा विविध बाबींविषयी नागरिकांचे https:/eol2022.org/CitiizenFeedback%2c या लिंकवर दिलेल्या 17 प्रश्नांचे योग्य पर्याय निवडून नागरिक ऑनलाईन अभिप्राय नोंदवित आहेत.
याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती करण्यात आली असून याकरिता कल्पक संकल्पनांचा वापर करण्यात आलेला आहे. यादृष्टीने शहरात विविध ठिकाणी मोठी होर्डींग लावण्यात आली असून ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ची माहिती प्रदर्शित करणारी भित्तीचित्रे रेखाटण्यात आली आहेत. तसेच समाज माध्यमांवर शहरातील लोकप्रिय स्थळे, वैशिष्ट्यपूर्ण बाबी यांची माहिती प्रदर्शित करून त्यांच्या मनातील शहराविषयीच्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली जात आहे. या माध्यमातून शहरातील लक्षणीय गोष्टी नागरिकांपुढे मांडल्या जात आहेत.
समाज माध्यमांवरून ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ मध्ये अभिप्राय नोंदविण्यासाठी नागरिकांना विविध इमेजेसच्या माध्यमातून नियमित आवाहन करण्यात येत असून शहरातील मॉल्स, वर्दळीची स्थळे अशा ठिकाणी अभिप्रायाच्या लिंकचा क्यूआर कोड छापलेले स्टॅडींज तसेच पोस्टर्स ‘स्कॅन करा - फिल करा’ असा संदेश देत प्रदर्शित करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे शहरभर फिरणा-या एनएमएमटी बसेसवर ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ ची माहिती देणारे पॅनल्स लावण्यात आलेले असून बसेसच्या आतील बाजूस स्टिकर्सवरूनही क्यूआर कोड स्कॅन करून अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय अभिनव संकल्पना राबवित नागरिकांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी प्रशांत कॉर्नर, झामा ही सुप्रसिध्द मिठाईची दुकाने तसेच मॅक्डोनॉल्ड्स, डोमिनोज अशा लोकप्रिय दुकानांच्या खाद्यपदार्थ पॅकींग बॉक्सवर क्यूआर कोड छापून ‘स्कॅन करा - फिल करा’ चे आवाहन करण्यात आले आहे.
‘इज ऑफ लिव्हिंग इडेक्स’ सर्वेमध्ये नागरिक अभिप्राय सर्वेक्षणात (Citizen Preception Survey) अडीच लाखाहून अधिक नवी मुंबईकर नागरिकांनी आपला शहराविषयीचा अभिमान अभिप्राय नोंदवून व्यक्त केला असून प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने अभिप्राय नोंदविणे हे आपले शहराविषयीचे सामाजिक दायित्व आहे असे समजून 7 जानेवारी 2023 पर्यंत सुरु असलेल्या या नागरिक अभिप्राय सर्वेक्षणात सहभागी होऊन https:/eol2022.org/CitiizenFeedback%2c लिंकवर अभिप्राय नोंदवित आपल्या नवी मुंबई शहराला देशातील सर्वाधिक नागरिकांनी अभिप्राय नोंदविलेले नंबर 1 चे शहर म्हणून उच्च स्थान प्राप्त करून द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 28-12-2022 14:20:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update